‘मुंबईकडे कूच करणार…’ जरांगेंची घोषणा; महाजन म्हणाले,’…जायची गरजच पडणार नाही’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil mumbai rally girish mahajan reaction maratha reservation
manoj jarange patil mumbai rally girish mahajan reaction maratha reservation
social share
google news

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनासाठी जरांगे पाटील मराठा समाजासह अंतरावली ते मुंबई अशी पायी दिंडी काढणार आहे. या दिंडीचा मार्ग आज जरांगे पाटलांनी जाहीर केला.यावेळी जरांगेंनी मराठा समाज आणि मुंबईकरांना देखील आवाहन केले आहे.जरांगेंच्या या आंदोलनावर आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिक्रिया समोर आली आहेत. या प्रतिक्रियेत त्यांनी मनोज जरागेंना मुंबईत जायची गरजच पडणार नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे. (manoj jarange patil mumbai rally girish mahajan reaction maratha reservation)

गिरीश महाजन माध्यमांना प्रतिक्रिया देताना बोलत होते. मी 4-5 वेळा जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यांच्याशी बोललो आणि शेवटी मी त्यांच्याकडे गेलो. जरांगेंची मनधरणी करण्याचा हा प्रयत्न नाही. जरांगेनी जो मोठा लढा उभा केला आहे.तो अभिमानास्पद आहे, त्याबाबत अजिबात शंका नाही.अगदी वन मॅन आर्मी त्यांनी उभी केली आहे. इतका मोठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे. त्यांचे खरोखरोच कौतूकच केले पाहिजे,असे म्हणत गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांवर स्तुतीसूमने उधळली.

हे ही वाचा : ‘बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल…’, महंत राजूदास महाराज उद्धव ठाकरेंवर बरसले

शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करतंय. आम्हाला टीकणार आरक्षण द्यायचंय.क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. आता त्याची तारीख देखील जवळ आली आहे. त्याचबरोबर मागासवर्ग आयोग नेमून मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया कसा मागास आहे, हे आम्ही कोर्टाला पटवून देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय याबाबत योग्य निर्णय़ करेल,मराठा समाजाला नुसतं कुणबी नाही, तर सर्वानाच य़ा संदर्भातला आरक्षण मिळेल, त्यामुळे जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरजही पडणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईकरांना आवाहन

मनोज जरांगेनी यावेळी मुंबईकरांना आणि तेथील मराठा समाजाला देखील आवाहन केले आहे.कुणी गट तट ठेवू नका. कारण आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत, तिथपर्यंत आम्ही सांगितलंय, पण ज्यांच्या ओळखी नाहीत त्यांनी असे समजू नका आम्हाला सांगितले नाही, आम्हाला फोन आले नाहीत. यावेळेस मराठा आणि आपलेच भाऊ म्हणून लढा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ही विनंती यासाठीच आहे,कारणअशी संधी पुन्हा येणार नाही. तुम्हाला नसेल विचारले असेल तर स्वत:हून पुढे या.सगळ्या मराठा समाजाने मतभेद सोडून एकत्र यावे, अशी विनंती मनोज जरांगेनी मुंबईकरांना आणि मराठा समाजाला केली आहे.

हे ही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना धक्का देणार?

अंतरवाली ते मुंबई पायी दिंडी

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई पायी दिंडी कशी मार्गस्थ होणार आहे, याची माहिती देखील त्यांनी दिली.आंतरवालीवरून 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता दिंडी निघेल. अंतरवालीनंतर शहागड, गेवराई, पाडळशी, मांदळमोरी, तांदळा-मातुरी-खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, करंजी, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे जाऊन आझाद मैदान आणि दादरमधील शिवाजी पार्कवर दाखल होणार आहे. या दिंडी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT