Fact Check: पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनोज जरांगे होते का?
Manoj Jarange: पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनोज जरांगे होते असा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याच दाव्याचं नेमक सत्य काय आहे याचंच आम्ही Fact Check केलं आहे.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Bhandarkar Institute Fact Check: पुणे: मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन संपवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलं आहे. दहा दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंशी चर्चा करुन त्यांना आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळाला, असं असताना आता जरांगे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (maratha reservation fact check was manoj jarange among those who attacked bhandarkar institute in pune regarding the james lane book)
पुण्यातील (Pune) भांडारकर इन्स्टिटूटवर झालेल्या हल्ल्यात जरांगे पाटील देखील आरोपी होते असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. याप्रकारचे अनेक मेजेस देखील आता व्हायरल झाले आहेत. त्यामुळे जरांगे-पाटील खरंच भांडारकर इन्स्टिट्यूच्या प्रकरणात आरोपी होते का? त्यांचा कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या संघटनेशी संबंध होता का? याबाबतचं फॅक्ट चेक आपण करणार आहोत.
गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे हे राज्यात सर्वाधिक चर्चेत आहेत. त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सर्वच राजकीय पक्षांना दखल घ्यावी लागली. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करा असा आदेशच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. जरांगेंचा आदेश पाळत बड्या-बड्या नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आलेली. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचे मला समर्थन नाही असं जरांगे सातत्याने सांगतात.
हे ही वाचा>> उद्धव ठाकरे बद्रीनाथला गेले, पण.. घडलं भलंतच राजकारण!
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी केलेल्या टिकेमुळे जरांगेंचं नाव शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलं जातं. त्यातच आता भांडारकर इन्स्टिट्यूट प्रकरणात जरांगे देखील आरोपी होते असा दावा केला जात आहे.