Maratha Reservation : शिंदेंनी ठाकरेंना डावललं! राऊत संतापले; म्हणाले, “हिशोबाची वेळ…”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

All party meeting called by CM eknath shinde for Maratha Reservation. sanjay raut recites Shinde.
All party meeting called by CM eknath shinde for Maratha Reservation. sanjay raut recites Shinde.
social share
google news

All Party Meeting For Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. काही ठिकाणी हिंसेच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे सरकारकडून वेगाने हालचाली केल्या जात आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण, या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरूनच खासदार संजय राऊत यांना संताप अनावर झाला. (CM Eknath shinde not invite to Uddhav Thackeray in All party meeting on maratha reservation issue)

ADVERTISEMENT

मराठा आरक्षण मुद्द्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. पण, या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना डावलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या (युबीटी) अंबादास दानवे यांना विधान परिषद विरोधी पक्षनेता म्हणून निमंत्रण देण्यात आलेले आहे.

संजय राऊत म्हणाले, “घटका भरलीच आहे”

उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातील एकाही नेत्याला निमंत्रण दिले न गेल्याने खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊतांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले, “या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही.”

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ‘भाजप विद्रूप करून टाकलाय…’, मनोज जरांगेंची थेट फडणवीसांवर जहरी टीका

“शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण, शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरंगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र!”, असं टीकास्त्र संजय राऊतांनी शिंदे सरकारवर डागलं आहे.

हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही?, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांनाच सवाल

ADVERTISEMENT

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना निमंत्रण?

सरकारने सर्वपक्षीय बैठकीसाठी शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे यांनी निमंत्रण दिले आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या चार नेत्यांना निमंत्रित केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT