अरे हxxxx, तुझ्या xxxxx… राजेश टोपेंना शिवीगाळ, बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप Viral
जालना जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेचे राजकारण आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण टोपे आणि लोणीकरांचा वाद झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT
Jalana Audio Clip: राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्यावरून जोरदार राजकीय हंगामा सुरू आहे. तर दुसरीकडे एका वेगळ्याच घटनेमुळे राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे. जालना जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार राजेश टोपे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांची एक ऑडीओ क्लिप व्हायरल (Audio Clip) झाली आहे. त्यामध्ये ऑडीओ क्लिपमध्ये आमदार लोणीकर राजेश टोपे (MLA Rajesh Tope) यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचे दिसून येत आहे.
‘मध्यवर्ती’चं राजकारण टोकाला
काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली होती. त्या निवडणुकीत आपला मुलगा राहुल लोणीकर याला उपाध्यक्ष करण्यासाठी लोणीकर टोपेंबरोबर बोलत असल्याचे दिसत आहे. त्या जागेवरूनच टोपे-लोणीकर यांच्यामध्ये फोनवर बोलता बोलता वाद झाला आणि यावेळी नाही, पुढच्या वेळी बघू म्हटल्यानंतर बबन लोणीकरांनी राजेश टोपे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केलेली दिसते. त्या ऑडीओ क्लिपमध्ये राजेश टोपे यांना टोप्या, चोर, कुत्र्या आणि हरामखोरही म्हटल्याचे त्यामध्ये ऐकू येत आहे.
हे ही वाचा >> जावयाचा जीव सासूवर जडला, अंधारात चाळे सुरू असतानाच बायको आली अन्…
वाद बँकेच्या राजकारणाचा
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राहुल लोणीकर यांना उपाध्यक्षपद मिळाले नाही. त्यावरूनच टोपे आणि लोणीकर यांची शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून येत आहे. बँकेच्या राजकारणाचा वाद झाल्यानंतर लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी राजेश टोपे यांची गाडीही फोडली होती. तर राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यावर हल्ला केला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसातही गेले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
View this post on Instagram
ADVERTISEMENT
ऑडिओ क्लिप व्हायरल
या प्रकरणी राडा झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हेदेखील दाखल झाले होते. या प्रकरणानंतर राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यामधील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा होऊ लागली आहे. तर दुसरीकडे ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकरांनी टोपेंना शिवीगाळ केल्यामुळे राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे यावरूनही आता टीका होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
लोणीकर-टोपे वाद-संवाद
राजेश टोपे यांनी बबनराव लोणीकर यांच्याबरोबर बोलताना ते म्हणाले की, अर्जुनराव साक्षीदार आहेत, त्यांनासुद्धा मी बोललो. दानवेंना दोघांनाही बोललो. भैय्यासाहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. यावेळेस तुम्ही आम्हाला पण दिले पाहिजे. काय बोलणार आपण त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण, काल मी फोनवर बोललो आणि आत ते आले होते. लग्नाच्या तिथे आलेले. तर तसे आहे, पहिल्यांदा आपण बोललो. ते आज आले नाहीत, चर्चेत नव्हते. ते काहीही असो माझ्याकडून त्यांचं एवढचं झाले आहे. आपल्या राहुलला उपाध्यक्ष करायचे आहे. तर तुम्ही यावेळेस सोडावं असं मला वाटतं. त्यानंतर बबनराव लोणीकरांचा पारा वाढून त्यांनी त्यांना अर्वाच्च भाषा वापरत शिवीगाळ केली आहे.
हे ही वाचा >> आठ मुलींच्या बापानं केला दुसऱ्या लग्नाचा विचार, पत्नीला समजताच थेट सुपारीच…
ADVERTISEMENT