MLA Disqualification: ‘निकाल पक्षासाठी नाही तर देशासाठी महत्वाचा’, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
आमदार अपात्रतेच्या निकालाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये त्यावरूनच घमासान सुरू झाले आहे. तर आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावरूनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
राज्याच्या राजकारणात आजचा दिवस सर्वार्थाने महत्वाचा आहे. कारण कारण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकार कोसलळे होते. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र त्यादिवसांपासून आमदार अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. त्यावरच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील 16 आमदरांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज 10 जानेवारी रोजी निर्णय घेणार आहेत. या कारणामुळेच आजचा दिवस राज्यातील राजकारणासाठी सत्ताधारी आणि विरोधकांसाठी महत्वाचा असणार आहे. याविषयी बोलताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बोलताना शिंदे गटावर टीका करत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात कधीच घडलं नाही
आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या आमदार अपात्रतेवर बोलताना त्यांनी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय कोणतं संविधान पाळतात, राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटल्यासारखेच आहे. मात्र हा असा प्रकार महाराष्ट्रात कधीही घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >>Mla Disqualification : अध्यक्ष काही याचिका फेटाळू शकतात; निकमांनी काय सांगितलं?
लोकशाहीसाठी महत्वाचा
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना संविधानाची पायमल्ली होणार नाही याचीही काळजी घेणं महत्वाचे आहे. कारण राज्याचा आजचा निकाल हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा असला तरी तो लोकशाहीसाठी महत्वाचा असल्याचे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
भाजपचं नवीन संविधन
आमदार अपात्रतेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, आजचा दिवस महत्त्वाचाच आहे. हा न्याय फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही तर देशातील कोणते अध्यक्ष महोदय संविधान पाळत आहेत तेच अधोरेखित होणार आहे. त्याचबरोबर देशाच्या संविधानाप्रमाणे अध्यक्ष महोदय जर गेले तर 40 गद्दार बाद होणार आहेत. आणि जर कन्फ्युजन निकाल लागला तर भाजपचं नवीन संविधानाचा विजय झाल्याचे दिसून येईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. आदित्य ठाकरे यांनी निकाला विषयी बोलताना त्यांनी हे ही सांगितले की, हा निकाल पक्षासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या निकालाचा विचार करताना आपल्याला नागरिक म्हणूनही त्याचा विचार करावा लागणारा आहे.
ADVERTISEMENT
पदाची बदनामी नको
आदित्य ठाकरे यांनी निकालावरून बोलताना त्यांनी अध्यक्षांवरही जोरदार टीका केली आहे. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये तर संविधान पाळावं असंही त्यांनी खोचकपणे सांगितले. कारण हा निकाल फक्त राज्यासाठी महत्वाचा नाही, तर देशासाठीही महत्वाचा असणार आहे. त्यामुळे त्यांनी पदाची गरीमा राखावी असा खोचक सल्लाही त्यांनी त्यांना दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mla Disqualification : ‘अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे’; CM शिंदे स्पष्टच बोलले
ADVERTISEMENT