Nilesh Lanke : अजित पवारांचा विश्वासू शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, कोण आहेत निलेश लंके?
Nilesh Lanke NCP Sharad Pawar : निलेश लंके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असलेले निलेश लंके नेमके कोण आहेत?
ADVERTISEMENT

Nilesh Lanke NCP Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. लंके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असलेले निलेश लंके नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (mla nilesh lanke ncp sharad pawar speculation leave ajit pawar ncp politics maharashtra politics)
निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला अवघ्या तीन ते चारच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक अललेल्या अनेक नेत्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निलेश लंके यांनी शरद पवारांना साथ दिली तर ते लोकसभेचे उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : "अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीये", शिंदेंच्या नेत्याने थोपडले दंड
कोण आहेत निलेश लंके?
राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून केली होती. वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी शाखा प्रमुख पदापासून कामाला सुरूवात केली होती.
निलेश लंके यांनी त्यांच्या हंगा गावची ग्रामपंचायत देखील जिंकली होती.