Shiv Sena: ‘ठाकरेंच्या आमदारांना व्हीप बजावता येणार नाही’, CM शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

अहमदनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर आज (22 फेब्रुवारी) सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगान दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. मात्र, एका बाबतीत ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. ही सुनावणी सुरू असेपर्यंत शिवसेनेला ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप लागू करता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अहमदनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर आज (22 फेब्रुवारी) सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगान दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. मात्र, एका बाबतीत ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. ही सुनावणी सुरू असेपर्यंत शिवसेनेला ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप लागू करता येणार नाही. कोर्टाच्या या टिप्पणीमुळे एकनाथ शिंदे हे आता काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. याचबाबत जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावता येणार नाही, पाहा यावर शिंदे नेमकं काय म्हणाले:

‘आम्ही ‘मातोश्री’वर दावा केलेला नाही आणि करणार पण नाही, आम्हाला कोणत्याही प्रॉपर्टी आणि संपत्तीचा मोह नाही. लोकशाहीत मेरिटवर निर्णय होत असतात. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरिटवर दिलेला आहे. त्याचं आम्ही स्वागत केलंय.’

‘विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती मागितली होती. ती स्थगिती नाकारलेली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कायम ठेवलेला आहे. त्यामुळे पुढे जी सुनावणी होईल त्यावर निर्णय होईल. सध्याच्या परिस्थितीत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण याबाबतीत त्यांची याचिका फेटाळली आहे.’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मात्र, यावेळी त्यांना ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप लागू करता येणार नाही याविषयी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी काहीही उत्तर न देणं पसंत केलं. अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदचे आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे माध्यमांशी बोलत होते.

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp