Maratha Reservation : “मी त्याला फाडून खाईन”, आमदार गायकवाडांचं धक्कादायक विधान
shiv sena mla sanjay gaikwad News in marathi : जर कुणी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न केला, तर त्याचा जीव घेईन, त्याला फाडून टाकेन, असे वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.
ADVERTISEMENT

-जका खान, बुलढाणा
Sanjay Gaikwad News : ‘मी त्याच्या नरडीचा घोट घेईन. मी त्याला फाडून खाईन’, हे धक्कादायक विधान केलं आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी. बुलढाण्याचे आमदार असलेल्या गायकवाडांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हा इशारा दिला. इतकंच नाही, तर मागच्या सरकारमुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असं म्हणत गायकवाडांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारवर यांचं खापर फोडलं. (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Said, If Anyone Goes against Maratha Reservation, I will kill him)
आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात कुणी मधे येत असेल तर तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
हे ही वाचा >> ‘हल्ला झाला तेव्हा माझी पत्नी, मुलं…’, संदीप क्षीरसागरांनी सांगितलं हल्लेखोर कोण?
त्यावर बोलताना आमदार गायकवाड म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षणासाठी मागच्या 43 वर्षांपासून खूप हिणवलं गेलं. त्याची चेष्टा केली गेली. मस्करी केली गेली. अतिशय शांततेने त्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. पण, आता या गोष्टीचा उद्रेक होत चालला आहे.”