Mood of the Nation: मोदींचं स्वप्न भंगणार, महाराष्ट्रातही झटका? BJPला बहुमत पण... पाहा देशभरात भाजपला किती जागा
Mood of the Nation BJP: लोकसभा निवडणुकीत एनडीए हॅटट्रिक करेल असं मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हेत दिसत आहे. पण असं असलं तरी भाजपचं जे स्वप्न होतं ते या निवडणुकीत पूर्ण होताना दिसत नाहीए. तसेच महाराष्ट्रात देखील त्यांना झटका बसला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नरेंद्र मोदींचं स्वप्न भंगणार?
भाजपला बहुमत मिळणार, पण..
भाजपच्या जागा घटणार?
Mood of the Nation Pm Modi: मुंबई: लोकसभा निवडणुकीत एनडीए हॅटट्रिक करेल की विरोधी पक्ष काही आश्चर्यकारक कामगिरी करतील? हे समजून घेण्यासाठी इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात एनडीए हॅटट्रिक करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. (mood of the nation 2024 will modi dream be shattered will bjp face a big blow in maharashtra too bjp has a majority in lok sabha but is far from winning 400 seats)
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी फारसा वेळ शिल्लक नसताना, इंडिया टुडे ग्रुपने सी-व्होटरसह 'देशाचा मूड' समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. लोकसभेच्या सर्व 543 जागांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. दीड महिना चाललेल्या या सर्वेक्षणात सुमारे दीड लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये 35 हजार लोकांशी थेट बोलणे झाले. या पाहणीनंतर आपण या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की, आज निवडणुका झाल्या तर कोणाला किती जागा मिळतील?
'मूड ऑफ द नेशन'च्या सर्वेक्षणानुसार केंद्रात भाजप हॅटट्रिक साधणार असा अंदाज आहे. सर्वेक्षणातील 543 जागांपैकी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे 300 चा आकडा गाठताना दिसत आहेत. पण पंतप्रधान मोदींनी जे 400 जागांचं स्वप्न पाहिलं आहे ते मात्र, काही पूर्ण होताना दिसत नाही. तसंच महाराष्ट्रात देखील भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे.










