Majhi Ladki Bahin योजनेत मोठा बदल, घरोघरी येणार टीम; काय आहे सातारा पॅर्टन?
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. सरकारतर्फे योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांना कुठेही अर्ज करायला जाण्याची गरज नाही.
ADVERTISEMENT
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यसरकारतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा झाल्यापासून,या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयात महिलांची एकच गर्दी जमली आहे. तसेच सरकारी कार्यालयात तलाठी आणि ग्रामसेवकांमार्फत महिलांची आर्थिक लुट होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. या सर्व गोष्टी पाहता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत (mukhymantri majhi ladaki bahin yojana) मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमका हा बदल काय असणार आहे? हे जाणून घेऊयात. (mukhymantri majhi ladaki bahin yojana women fill form nari shakti app shambhuraj desai marathi news)
ADVERTISEMENT
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. सरकारतर्फे योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांना कुठेही अर्ज करायला जाण्याची गरज नाही. कारण आम्ही काही पथक तयार केली आहेत,या पथकातील सदस्य आता घरोघरी जाऊन नारीशक्ती अॅपवर महिलांचे अर्ज भरून घेणार आहे, अशी नवीन माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे.
हे ही वाचा : उत्पन्नाचा दाखला नसेल तरी टेन्शन घेऊ नका, असे मिळतील 1500 रुपये!
शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, महिलांना या योजनेसाठी कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही आहे. याउलट आपण त्यांच्या दारात जायचं आहे. यासाठी 5 जणांची पन्नास पथक बनवण्यात येणार आहेत. या पथकातील सदस्य महिलांच्या घरोघरी जाऊन अर्ज भरणार आहे. या संदर्भात सातारा जिल्ह्यातील प्रस्ताव तयार करायचा आहे. सोमवारी यासाठी शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली.
हे वाचलं का?
तसेच कुठला दाखल नाही याची त्या संबधित विभागाला माहिती देऊन त्यांना तात्काळ तो दाखला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६ ऑगस्टपूर्वी साताऱ्यातील 8 लाख महिलांची नोंद करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे. या योजनेसाठी पैसे मागणाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान यामुळे आता सरकारी कार्यालयात होणारी महिलांची गर्दी टळणार आहे. आणि महिलांची पायपीट देखील वाचणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana App: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT