“2014 नंतर भाजपसोबत युतीला माझा विरोध होता”, संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai Tak chavadi : Sanjay Raut says i had against alliance with bjp
Mumbai Tak chavadi : Sanjay Raut says i had against alliance with bjp
social share
google news

Sanjay Raut On Mumbai Tak Chavadi : काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मुंबई Tak चावडीवर म्हणाले की, 2019 मध्ये शिवसेनेसोबत करणे ही भाजपची चूक होती. त्याच पद्धतीचे विधान शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे. ‘मुंबई Tak चावडी’वर बोलताना संजय राऊतांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. 2014 नंतर भाजपसोबत युती करण्याला माझा विरोध होता, असं सांगताना राऊतांनी त्यामागील कारणही सांगितलं.

ADVERTISEMENT

‘मुंबई Tak चावडी’मध्ये खासदार संजय राऊत यांना “जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला. ज्या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण म्हणजे जे अस्मिता होतं. बाळासाहेबांसाठी प्राणापेक्षा कमी नव्हतं. तो पक्ष, ते नाव आणि चिन्ह… दोन्हीही काढून घेण्यात आलं. राजकारणात असं म्हणतात की, कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कायमचा वैरी नसतो. जर उद्या भाजपसोबत युती करण्याची वेळ आली, तर तुमची भूमिका काय आहे?”, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका मांडली.

हेही वाचा >> Mumbai Tak Chavadi : सगळ्यांना भिडणारे संजय राऊत नेमकं कुणाला घाबरतात?

खासदार संजय राऊत म्हणाले, “मी असा विचार कधीच करत नाही. मी असा नकारात्मक विचार कधी करत नाही. तुम्ही जे म्हणता मला की तुमच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं. याचं कारण मी कुणालाच नाही म्हणत नाही. नकारात्मक विचार मी कधीच करत नाही. तुरुंगात जाणंही मी सकारात्मक घेतलं.”

हे वाचलं का?

शिवसेनेने सर्व जागा लढल्या पाहिजेत, राऊतांना असं का वाटतं?

याच प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, “तुम्ही जे म्हणता की भाजपसोबत जाणार की नाही. 2014 नंतर परत भाजपबरोबर संबंध ठेवायला माझा विरोध होता, कारण हे परत आपल्या फसवतील अशी माझी भावना होती. माझं असं म्हणणं कायम आहे की कधीतरी शिवसेनेने सर्व जागा लढल्या पाहिजेत. एकदा दोनदा.”

हेही वाचा >> “संजय राऊत आणि तुला गोळ्या घालणार, एका महिन्यात स्मशानात पाठवणार”

शिवसेना एकहाती सत्तेत न येण्याला युती कारणीभूत

“आपला विस्तार करायचा असेल, तर आपण कधीतरी युती-आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे. तरच पक्षाचा विस्तार होईल. आज कर्नाटकात काँग्रेस स्वबळावर आली. अनेक राज्यांत प्रादेशिक पक्ष स्वबळावर येतात. तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल अशा अनेक ठिकाणी. पण, शिवसेना इतका मोठा पक्ष बाळासाहेब ठाकरेंसारखा महान नेता आम्हाला लाभून सुद्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आमचं राज्य प्रस्थापित करू शकलो नाही. कारण आम्ही कायम युतीमध्ये लढलो”, अशी भूमिका संजय राऊतांनी या मुलाखतीत मांडली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT