Mumbai Tak Chavadi : सगळ्यांना भिडणारे संजय राऊत नेमकं कुणाला घाबरतात?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) खासदार संजय राऊतांची शैली सगळ्यांना परिचयाची आहे. मुद्दा कुठलाही असला, तरी राऊत रोखठोक भाष्य करतात आणि पक्षाची भूमिका लावून धरतात, अशी त्यांची राजकीय ओळख. पण, विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत (Sanjay Raut) कुणाला घाबरत असतील? राऊतांच्या आयुष्यात कोणती व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला ते घाबरतात? या प्रश्नांचं उत्तर मिळालं, ‘मुंबई Tak चावडी’वर! संजय राऊतांनी काय दिलं उत्तर? (Mumbai Tak Chavadi Sanjay Raut afraid of Whom)

ADVERTISEMENT

संजय राऊतांनी ‘मुंबई Tak चावडी’वर दिलखुलास गप्पा मारल्या. अनेक मुद्द्यांवर संजय राऊतांनी काही किस्से सांगत उत्तरं दिली. राजकीय प्रश्नांपासून ते प्रेमापर्यंतच्या प्रश्नांवर संजय राऊत व्यक्त झाले. असाच एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला, ज्याला राऊतांनी हसून उत्तर दिलं.

“संजय राऊत आणि तुला गोळ्या घालणार, एका महिन्यात स्मशानात पाठवणार”

संजय राऊत अनेकदा शिवराळ वक्तव्य करतात. ज्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असते. यामुळे ते अनेकदा अडचणीतही येतात. शुक्रवारी ‘मुंबई Tak चावडी’त संजय राऊतांना यावरूनच प्रश्न विचारण्यात आला की, ‘प्रत्येकाचं आपल्या आईसोबत एक छान बाँडिंग असतं. मागे तुमचंही तुमच्या आईसोबत असलेलं बाँडिंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. जेव्हा आपण लहान असतो त्यावेळी आपल्याला एक धाक असतो की, मी एखादा अपशब्द उच्चारला तर आई रागवेल. तसंच आता तुम्ही माध्यमांसमोर जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही एखादा अपशब्द उच्चारता त्यावेळी तुम्हाला ही भीती वाटते का की, आई काय म्हणेल किंवा रागवेल? ‘

हे वाचलं का?

‘तुमचा दाभोळकर करू’, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

रोख-ठोक संजय राऊत ‘या’ व्यक्तीला घाबरतात…

संजय राऊत जेव्हा अपशब्द वापरतात तेव्हा त्यांना त्यांच्या आईची भीती वाटते. तुमचे यावरून आई कधी कान ओढते का? असं पुढे विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘हो… मी आईला घाबरतो. मला तिची भीती वाटते’, असं म्हणत राऊतांनी त्यांना धाक वाटणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगून टाकलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT