मुंबई Tak चावडी: ‘खडसेंनी भाजपमध्ये परत यावं कारण…’, विनोद तावडेंनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई तक

Political News of Maharashtra: एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पुन्हा यावं का? याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घ्या.

ADVERTISEMENT

mumbai tak chawdi eknath khadse bjp vinod tawde maharashtra politics
mumbai tak chawdi eknath khadse bjp vinod tawde maharashtra politics
social share
google news

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी भाजपचे माजी ज्येष्ठ नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा पक्षात येणाचं आवाहन केलं आहे. मुंबई Tak च्या ‘चावडी’वर (Mumbai Tak Chawdi) बोलत असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपला (BJP) गरज आहे असंही ते यावेळी म्हणाले. याशिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडीबाबत देखील चावडीवर त्यांनी स्पष्टपणे मतं व्यक्त केली आहेत. (mumbai tak chawdi eknath khadse bjp vinod tawde maharashtra politics)

नाराज नेत्यांबाबत विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?

2014 पासून राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं नेतृत्व करण्यास सुरुवात झाली. पण तेव्हापासून राज्यातील भाजपचे अनेक नेते हे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. काहींनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली तर काहींनी गप्प राहणं पसंत केलं. पण याच सगळ्याबाबत मुंबई Tak च्या ‘चावडी’वर विनोद तावडे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी फारच रंजक उत्तर दिलं.

‘ज्या प्रकारे माझी मैत्री असते, संबंध असतात.. तर सगळ्या पक्षातील दु:खी हे माझ्याशी बोलतात. त्याला काही अडचण नसते. केवळ भाजपचेच नाही.. सगळे एकत्र प्रवास करतो.. तेव्हा बोलतात आमच्या पक्षात असं आहे.. ते शेअरिंग असतं. असंही त्यातलं असतं..’

हे ही वाचा >> Maharashtra Political news : प्रीतम मुंडेंना अमरसिंह पंडित बसवणार घरी?

‘ज्याच्यावर अन्याय असतो त्यांच्याकडे पेशन्स असले पाहिले. उदाहरण.. विलासराव देशमुख.. विधानपरिषदेला भाजपने मदत केलेली.. शिवसेनेने मदत केली असती तर ते विधानपरिषदेवर निवडून आले असते. अँटी काँग्रेस म्हणून निवडून पण पडले. पण झाले ना मुख्यमंत्री 2004 ला..’ असं विनोद तावडे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp