Sharad Pawar: ‘ही वाद घालायची वेळ नाही..’, केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांची गुगली!
Sharad Pawar and AAP: मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज (25 मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर बरीच चर्चा झाली. ज्यानंतर अरविंद केजरीवाल आणि शरद […]
ADVERTISEMENT

Sharad Pawar and AAP: मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज (25 मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर बरीच चर्चा झाली. ज्यानंतर अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये शरद पवारांनी आपण लोकशाही वाचविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी कायम आहोत. असं सांगत त्यांना समर्थन दिलं आहे. (ncp chief sharad pawar has announced that he will support to arvind kejriwal)
पाहा पत्रकार परिषदेत शरद पवार काय-काय म्हणाले:
‘सध्या संसदीय लोकशाहीच्या व्यवस्थेवर आघात सुरू आहे’
‘देशासमोर एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. हा विषय फक्त दिल्लीचा आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही मानतो की, लोकशाही वाचवायची आहे की नाही.. कारण दिल्लीत जो आघात होतोय. तो संसदीय लोकशाहीच्या व्यवस्थेवर आघात होतोय. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार हे सत्तेत असतं. ते निर्णय घेतील की नेमणूक केलेले राज्यपाल? निवडून आलेल्या सरकारला दुर्लक्षित केलं जाण्याची समस्या ही आज सर्वांसमोर आहे.’
‘ही वेळ वाद घालण्याची नाही, लोकशाही वाचविण्याची आहे’
‘आम्हाला हे वाटतं की, ही वेळ आपण कोणत्या पक्षाचे किंवा तुमची नीती काय आहे यावर वाद घालण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे लोकशाही वाचविण्याची. संसदीय लोकशाही वाचविण्याची. तसंच सामान्य लोकांचं मत घेऊन आपल सरकार बनिवण्याचा जो अधिकार आहे तो सामान्य जनतेचा मतदानाचा अधिकार वाचविण्यासाठी आज अरविंदजी हे इथे आले आहेत. याबाबत समर्थन मागण्यासाठी.’
केजरीवालांना पवारांचं समर्थन, ‘अशी’ करणार मदत
‘माझं म्हणणं एवढंच आहे की, मला पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्रातील जनता देखील अरविंदजींनी जो प्रस्ताव दिला आहे याचं समर्थन करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याकडून पूर्ण ताकदीने मदत करेल. पण मी आता विचार करत होतो की, मला सभागृहात येऊन 56 वर्ष झाली. या 56 वर्षाचा एक फायदा होतो की, देशातील कोणत्याही राज्यात गेलो तर तिथे कोणी नेता असेल, किंवा खासदार असो त्यांच्याशी माझे काही ना काही वैयक्तिक नाती ही मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाले आहेत. अनेक लोकांसोबत मी काम केलं आहे. त्यामुळे प्रश्न दिल्ली किंवा तुमचा नाही..’