Ajit Pawar Jacket: अजितदादांचा पॅटर्नच वेगळा, आता गुलाबी जॅकेट नाही तर थेट...
Ajit Pawar Pink Jacket: उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रा काढून महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्याचवेळी अजित पवारांनी त्यांच्या जॅकेटचा पॅटर्न आज येवल्यात बदलला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवारांचा नवा पॅटर्न
अजित पवारांनी गुलाबी जॅकेट का बदललं?
अजित पवारांनी परिधान केलं नवं जॅकेट
Ajit Pawar Jacket and NCP: येवला: शुभ्र पांढऱ्या रंगाचा कुडता आणि पायजमा असा साधा पोषाख परिधान करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. आतापर्यंत अनेकदा अजित पवार हे अशाच पोषाखात संपूर्ण सार्वजनिक जीवनात वावरत असल्याचं आपण पाहिलं आहे. पण आता काही दिवसांपासून अचानक अजित पवार हे गुलाबी जॅकेटमध्ये दिसू लागले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या पक्षाचं संपूर्ण कॅम्पेन हे गुलाबी रंगानेच सुरू झालं आहे. पण असं असताना आता अजितदादांनी आज (9 ऑगस्ट) त्यांचा पॅटर्नच बदलला आहे. (ncp jan sanman yatra ajit pawar pattern is different now he wears a Paithani jacket instead of a pink jacket)
गुलाबी नाही तर पैठणी जॅकेट.. अजितदादांचा पॅटर्नच बदलला!
अजित पवार हे गुलाबी जॅकेटमुळे सध्या चर्चेत आहेत. असं असताना आज अचानक ते पैठणी जॅकेट परिधान केलेले दिसून आले. त्यामुळे आता त्यांच्या या जॅकेटची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा>> Ajit Pawar : "...म्हणून मी गुलाबी जॅकेट घालायला लागलो", अजित पवारांनी सांगितलं कारण
त्याचं झालं असं की, अजित पवार जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पोहचले. जिथे त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. याचवेळी येवल्यातील प्रसिद्ध असलेल्या पैठणीपासून तयार करण्यात आलेला खास जॅकेट हे अजितदादांना भेट देण्यात आलं. त्यामुळे त्या जॅकेटचा मान ठेवत अजितदादांनी त्यांचं गुलाबी जॅकेट बाजूला ठेवून पैठणी जॅकेट अंगावर चढवलं. याचवेळी अजित पवारांना पैठणीचाच खास फेटाही बांधण्यात आला होता.
महिला मतदारांना आकर्षित करण्यात प्रयत्न
लोकसभा निवडणुकीतील पडझडीनंतर अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपली स्वत:ची एक व्होट बँक तयार करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवार यांनी 'माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा करून महिला व्होट बँक आपल्या बाजून कशी झुकेल यासाठी प्रयत्न सुरू केले.










