शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते -जयंत पाटील
शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर ज्यांना अश्रू अनावर झाले, त्यापैकी एक नेते होते जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. पण, नंतर शरद पवारांनी निर्णय मागे घेतला आणि सगळा गोंधळ थांबला. या सगळ्या नाट्यानंतर जयंत पाटील यांच्या एका विधानाने मात्र, अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. […]
ADVERTISEMENT

शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर ज्यांना अश्रू अनावर झाले, त्यापैकी एक नेते होते जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. पण, नंतर शरद पवारांनी निर्णय मागे घेतला आणि सगळा गोंधळ थांबला. या सगळ्या नाट्यानंतर जयंत पाटील यांच्या एका विधानाने मात्र, अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. शरद पवारांनी राजीनामा द्यावा, यासाठी काही लोक देव पाण्यात घालून बसले होते, असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील साखराळे या त्यांच्या मूळ गावी एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमात बोलत होते.
2 मे रोजी शरद पवार यांनी घोषणा केली की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, तर महाराष्ट्र आणि देशातील राजकीय वर्तुळात त्यांची कंपने जाणवली. तीन दिवस यावरून राजकीय गोंधळ सुरू होता. देशातील विरोधी पक्षाच्या नेते, राष्ट्रवादीतील नेते, कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरल्यानंतर शरद पवारांनी निर्णय बदलला आणि चर्चेवर पडदा पडला.
“अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते”
या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या कारणाचा उहापोह सुरू असतानाच जयंत पाटील यांनी एक विधान केलं. जयंत पाटील नक्की काय म्हणाले ते पाहूयात…
जयंत पाटील असं म्हणाले, “शरद पवार साहेबांच्या राजीनाम्यामुळे एक वादळ निर्माण झालं. ते वादळ त्यांच्या राजीनामा मागे घेण्याने शांत झालं. पण, चार दिवसांत टिव्ही सुरू केला की, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडी याच्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. आणि बरेच लोक देव पाण्यात घालून बसलेले होते की, जे होतंय ते तसंच व्हावं. पण, आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर पवार साहेबांनी आपला निर्णय बदलला.” जयंत पाटील यांनी हे विधान सांगलीत केलं.