NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ajit Pawar factions and Sharad Pawar factions: नवी दिल्ली: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि अधिकृत चिन्हासाठी काका-पुतणे हे आमनेसामने आले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. खरं तर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. आता त्यांना 13 सप्टेंबरपर्यंत नोटीसचे उत्तर द्यावे लागणार आहे. तर अजित पवार गटाने यापूर्वीच उत्तर दाखल केले आहे. (ncp name and official symbol issue ec grants three more weeks to sharad pawar group for replies to notice ajit pawar factions)

ADVERTISEMENT

प्रत्यक्षात अजित पवार गटाने 30 जून रोजी निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष बदलल्याची माहिती दिली होती. यासोबतच अजित पवार यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार गटाने तेच खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती.

हे ही वाचा >> जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंवरच चिडले, म्हणाले, “दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा…”

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने म्हटले होते की, निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्राद्वारे कळवण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या ठरावाद्वारे 30 जून 2023 रोजी अजित पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या ठरावावर विधिमंडळ आणि संघटनात्मक दोन्ही शाखांच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

हे वाचलं का?

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राहतील, असेही यामध्ये सांगण्यात आले. याचा शरद पवार गटाने इन्कार करत निवडणूक आयोगात आपला दावा केला होता. या दोघांच्या दाव्यांबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती, त्यावर आता शरद पवार गटाला उत्तर द्यायचे आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar:मोदींकडून मोठी ऑफर?, Sharad Pawar यांनी अजितदादांना दाखवली जागा!

2 जुलै रोजी अजित पवारांनी केलेले बंड

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मागील महिन्यात महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 2 जुलै रोजी अजित पवारांसह छगन भुजबळ आणि इतर 8 दिग्गज नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणालेले की, मला राष्ट्रवादीच्या सर्व लोकांचा आशीर्वाद मिळाला आहे. यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. सध्या काही आमदार हे शरद पवार गटात आहेत तर काही आमदार हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे आता पक्ष आणि चिन्ह याचा वाद हा निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT