Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, फायदा होणार काँग्रेसला
विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला नाही, तर विधानसभा अध्यक्षांना असतो. त्याचबरोबर ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता नेमला जातो. अशा स्थितीत सध्या कोणाकडे किती आमदार आहेत ते पाहुयात.
ADVERTISEMENT

Maharashtra Polictical Crisis, Congress : अजित पवारांनी बंड करुन ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी केलेल्या खेळीमुळे राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलली. अजित पवारांच्या बंडाचा काहींना फायदा झाला, तर काहींची धाकधूक वाढली. या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस वेट अण्ड वॉचच्या भूमिकेत होती. शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीत देखील दोन गट पडल्याने आता काँग्रेसने आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तो डाव नेमका काय आहे, तेच आपण समजावून घेऊयात…
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत देखील शिवसेनेसारखी फुट पडल्याचं स्पष्ट आहे. अजित पवार आता आम्हीच खरा पक्ष असा दावा देखील करत आहे. सरकारमध्ये सहभागी होण्याआधी शुक्रवारीच अजित पवारांनी त्यांच्या विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते पद आता रिक्त झालं आहे. अजित पवारांनी रविवारी तातडीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. ही सगळी घडमोड घडताच जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे व्हिप ची जबाबदारी देखील जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्यात आली.
विरोधी बाकावरील समीकरणं बदलणार
असं असलं तरी विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला नाही, तर विधानसभा अध्यक्षांना असतो. त्याचबरोबर ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता नेमला जातो. अशा स्थितीत सध्या कोणाकडे किती आमदार आहेत ते पाहुयात.
वाचा >> ‘…मग सत्तेत राहायचं कशाला?’, अजित पवारांची एन्ट्री, संजय शिरसाट काय बोलले?
राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार आहेत. त्यातील शरद पवारांकडे 16 आमदार आहेत तर अजित पवारांकडे 24 आमदार असल्याचं दावे केले गेलेत. भूमिका न घेतलेले असे 13 आमदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसचे विधानसभेमध्ये 45 आमदार आहेत.