Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंना हादरा! उपनेत्या गोऱ्हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
उद्धव ठाकरेंकडून पक्ष बांधणीचं काम सुरू असतानाच आता जवळच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांची साथ सोडली आहे.
ADVERTISEMENT
Neelam Gorhe Latest News : वर्षभरापूर्वी झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून पक्षाची नव्याने बांधणी केली जात असतानाच आणखी एक हादरा बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. नीलम गोऱ्हेंनी शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Neelam Gorhe Joined eknath Shinde shiv sena)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांची अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेली गळती अजूनही थांबलेली नाही. उद्धव ठाकरेंकडून पक्ष बांधणीचं काम सुरू असतानाच आता जवळच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांची साथ सोडली आहे.
वाचा >> Samruddhi Accident : ‘त्या’ बस अपघाताबद्दल मोठी अपडेट! चालकाच्या रक्तात सापडले…
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. नीलम गोऱ्हे या ठाकरेंच्या शिवसेनेत उपनेत्या होत्या. आणखी एक महत्त्वाच्या महिला नेत्या शिवबंधन तोडून गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका मानला जात आहे.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर शिशिर शिंदे यांनीही थेट उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांनीही काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
ADVERTISEMENT
विधान परिषदेतील ठाकरेंचं संख्याबळ घटलं
मनिषा कायंदे पाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलं आहे. सर्वात आधी विप्लव बाजोरिया यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर मनिषा कायंदे या दुसऱ्या आमदार होत्या. त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनीही शिंदेंच्या सेनेची वाट धरली आहे. त्यामुळे तीन आमदार ठाकरेंचे कमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
वाचा >> अजितदादांकडून NCP जाणार? सिब्बलांचा मोठा दावा; म्हणाले, “घड्याळ आणि धनुष्यबाण…”
आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेत 8 आमदार राहिले आहेत. यात सचिन अहिर, आमश्या पाडवी, उद्धव ठाकरे, अनिल परब, सुनील शिंदे, अंबादास दानवे, नरेंद्र दराडे आणि दुष्यंत चतुर्वेदी या आमदारांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT