‘महाविकास आघाडीमध्ये नवे मित्र मिळाले’, राऊतांनी बैठकीनंतर स्पष्टच सांगितलं
महाविकास आघाडीच्या आजच्या झालेल्या बैठकीमध्ये नव्या मित्रपक्षांचा समावेश झाला असून वंचितचाही समावेश झाला आहे. त्यामुले शेकाप, आप आणि वंचित बरोबर आल्याने आता महाविकास आघाडीचा विस्तार झाल्याचेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची आज सगळ्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीविषयी बोलताना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षातील महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रदीर्घ चर्चा होऊ महाविकास आघाडीचा आज विस्तार झाल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
नवे मित्र पक्ष
महाविकास आघाडीच्या बैठकीत आज महत्वाच्या विषयावर चर्चा होऊ न आज मविआचा विस्तार झाला आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी, जनता दल युनियटेड, शेतकरी कामगार पक्ष आणि आपचा समावेशही झाला असून आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >>Manoj Jarange : 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण, रायगडाच्या पायथ्यावरून जरांगेंची गर्जना
‘मविआ’चा विस्तार
महाविकास आघाडीमध्ये नवे नवे सहकारी मिळाल्याने महाविकास आघाडीचा विस्तार झाला आहे. यावेळी वंचितला ज्या प्रमाणे पत्र पाहिजे होते. त्याप्रमाणे त्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे येत्या 2 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीलाही प्रकाश आंबेडकर स्वतः सहभागी होणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
कोणतेच मतभेद नाहीत
महाविकास आघाडीच्या बैठकीला शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, आमदार अनिल देशमुख यांच्यासह महत्वाच्या नेत्यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यामुळे वंचितसह कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.










