Nilesh Rane: भास्कर जाधवांना शिव्या.. ठाकरेंवर गंभीर आरोप, निलेश राणेंचं अत्यंत वादग्रस्त भाषण जसंच्या तसं...
Nilesh Rane Guhagar Speech: गुहारमध्ये जाहीर सभेत निलेश राणे यांनी शिवसेना (UBT) आमदार भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल करताना अत्यंत शिवराळ शब्दात टीका केली. वाचा निलेश राणे यांचं भाषण जसंच्या तसं..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

निलेश राणेंचं अत्यंत वादग्रस्त भाषण

गुहागरमध्ये नितेश राणेंनी पातळी सोडली

भास्कर जाधवांना जाहीर सभेत शिव्या
Nilesh Rane Guhagar Speech: गुहागर: आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असणारे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आज (16 फेब्रुवारी) गुहागर येथील जाहीर सभेत अत्यंत वादग्रस्त आणि अत्यंत शिवराळ भाषेत भाषण करत शिवसेना (UBT) चे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. (nilesh rane used abusing words to bhaskar jadhav serious allegations against thackeray bjp leader highly controversial speech as it is)
याशिवाय निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर देखील अत्यंत गंभीर असे आरोप यावेळी केले आहेत.
निलेश राणेंचं वादग्रस्त भाषण जसंच्या तसं..
'उद्धव ठाकरे जेव्हा कणकवलीला आले होते.. कणकवलीमध्ये हा तुमचा चिपळूणचा भास्कर नको नको ते शब्द बोलला.. नितेश राणेला बोललेलं मला चालतं पण राणे साहेबांना बोललेलं मला चालत नाही. आमच्या नेत्यांना वेडवाकडं बोलायचं नाही.'
'हा भास्कर नाशिकला गेला तिकडे हा भ*$# आमच्यावर टीका.. नाशिकच्या सभेत राणे साहेबांचं काय घेणं-देणं.. हा शिवाजी पार्कला उभा राहिला तिकडे पण राणे साहेबांवर टीका.. परवा कणकवलीला आला तेव्हाही परत टीका करून गेला. गुहागर मतदारसंघाची एक उंची होती. मी अनेक वर्षात गुहागरमध्ये ये-जा करत आहे.'