नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची 'ही' यादी, राज्यातलं वातावरण कोण ढवळून काढतंय?
Mahayuti Minister Nitesh Rane : मागच्या काळात झालेली वादग्रस्त वक्तव्य राज्यातील वातावरण ढवळूण काढण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. विशेषत: ही सर्व वक्तव्य मुस्लिम धर्मीयांशी संबंधीत असल्यानं हे जाणीवपूर्वक केलं जातंय का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातलं वातावरण कोण ढवळून काढतंय?
नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यांचा अर्थ काय?
मंत्री झाल्यानंतरही वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच...
Nitesh Rane : राज्यात 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. 15 मार्चला या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. या संपूर्ण कार्यकाळात देवेंद्र फडणवीस सरकारचे एक मंत्री मात्र, कायम चर्चेत आहेत. ते म्हणजे मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणे. नितेश राणे यांनी मागच्या काळातही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती, मात्र मंत्री झाल्यानंतर ते अशी वक्तव्य टाळतील अशी शक्यता वाटत होती. मात्र वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अजूनही सुरूच आहे. नागपूरमध्ये काल मोठा हिंसाचार झाला. राज्यात मागच्या काळात झालेले वादग्रस्त वक्तव्यच वातावरण ढवळून काढण्यासाठी कारणीभूत असल्याचं विरोधक म्हणत आहेत.
हे ही वाचा >> Nagpur मध्ये अचानक का भडकली एवढी हिंसा? घटनेची A to Z स्टोरी
लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्होट जिहाद अशा वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख करत नितेश राणेंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तर मंत्री होण्यापूर्वी त्यांनी थेट मशिदीत घुसण्याचीही भाषा केली होती.
"शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम नव्हतेच..."
"आमच्यातले काही टाळके सांगतात, शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते, हे उगाच टेपरेकॉर्डर चालवतात, स्वराज्याची लढाई हे इस्लाविरोधात होती, हिंदू-मुस्लिम लढाई होती, या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लामसमोर झुकू दिला नाही, हा इतिहास आहे" असं नितेश राणे म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त कसबा संगमेश्वरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं होतं.
"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"
नीतेश राणे यांनी पुणे जिल्ह्यातील सासवड गावात हे वक्तव्य केलं होतं. "महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांची बहीण तिथून निवडणूक जिंकत आहेत. सर्व दहशतवादी त्याला मतदान करतात. सर्व दहशतवाद्यांचा समावेश करूनच हे लोक खासदार झाले आहेत."










