शरद पवार-अजित पवारांची भेट; जयंत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीत फूट नाही, कारण…’
शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचे स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
Ajit Pawar Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
पुणे शहरानजीक असलेल्या कोरेगाव पार्क येथील उद्योगजक अतुल चोरडीया यांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची बैठक पार पडली. दोन्ही नेते का भेटले याची चर्चा सुरू असतानाच जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचे सांगितले.
वाचा >> शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त बैठकीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,’भेट झाली…’
सांगोला येथे माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “कुणी कुणाला कधीही आणि कुठेही भेटू शकतो. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट गुप्त नव्हती. एका उद्योगपतीच्या घरी योगायोगाने झालेली भेट आहे. मी शरद पवारांबरोबर गेलो होतो आणि निघून आलो. बैठकीत काय चर्चा झाली मला माहिती नाही. माझी भूमिका मी यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे.”
हे वाचलं का?
जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस
जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांचे बंधू जयसिंग पाटील यांना नोटीस आल्यानंतर पाटलांवर दबाव टाकणे सुरू असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, “माझ्या बंधूंना ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीच्या संदर्भात त्यांनी माहिती विचारली. ते चार दिवसांपूर्वीच जाऊनही आले आहेत. त्यांना आवश्यक ती माहिती दिली. पण याचा इतर ठिकाणी संबंध जोडणं योग्य नाही.”
वाचा >> ह्रदयद्रावक! ‘खिशात 1000 रुपये आहेत, अंत्यसंस्कार करा’, चंद्रपूरमध्ये घरातच घेतला फास
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. पण, जयंत पाटलांनी केलेल्या विधानाने संशय वाढवला आहे. जयंत पाटील म्हणाले, “पक्षात फूट कुठे पडलीये? सगळेच शरद पवारांचे फोटो लावताहेत. सगळेच शरद पवारांसाठी आम्ही काम करतोय, असं म्हणताहेत. त्यामुळे अजून तरी फूट नजरेत नाहीये. तेच त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं आहे”, असं विधान जयंत पाटलांनी केलंय.
तुम्ही देखील लवकरच मंत्रिमंडळात दिसणार असल्याची चर्चा आहे. “अशा चर्चा काय चालू असतात. प्रत्येक आमदार कधीही मंत्री होऊ शकतो. अशा आशयाने लोक बातम्या लावत असतात. तुम्ही त्या बातम्या फारशा मनावर घेऊन नका”, असंही जयंत पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या गटाकडून शरद पवारांच्या फोटोचा वापर
अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी बंड केले. त्यानंतर शरद पवारांनी बंडखोरांना फोटो वापरू नका, असे सांगितले. पण, अजित पवार गटाकडून सर्रासपणे शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे. अलिकडेच ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. त्या कार्यालयातही शरद पवारांचे फोटो लावलेले आहेत. इतर ठिकाणीही शरद पवारांचे फोटो आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT