Narayan Rane: 'लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, पण..' अशोक चव्हाणांमुळे राज्यसभेत पत्ता कट झालेल्या राणेंच्या विधानाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

नारायण राणेंचं मोठं विधान
नारायण राणेंचं मोठं विधान
social share
google news

Narayan Rane Loksabha Election: गोकूळ कांबळे, रत्नागिरी: राज्यसभा निवडणुकीच्या आदल्यादिवशी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मात्र पत्ता कट झाला. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये नारायण राणे यांचा समावेश होता. पण पुन्हा राणेंनाच उमेदवारी मिळेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, नारायण राणेंऐवजी आदल्या दिवशी भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राणेंचा पत्ता कापला. अशातच आता आपण लोकसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक नसल्याचं मोठं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. (not willing to contest lok sabha sensational statement of bjp minister narayan rane who could not get candidature in rajya Sabha election due to ashok chavan)

2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीत  रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, आता महाराष्ट्रात झालेल्या संपूर्ण फुटीनंतर संपूर्ण चित्र पालटलं आहे. अशातच भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा सांगत आहेत. याच मतदारसंघातून नारायण राणे यांना तिकीट देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, त्याआधीच नारायण राणे यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं यावेळी म्हटलं आहे. रत्नागिरी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

'लोकसभेसाठी मी इच्छुक नाही..'

'रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचाच हक्क आहे.. दावा आहे आणि तो कायम आहे.. उमेदवार कोण असेल तर वरिष्ठ ठरवतील. तो त्यांचा अधिकार आहे. उमेदवार हा कमळ निशाणीवरचा असेल एवढं नक्की.' 

 

 

'लोकसभेसाठी मी इच्छुक वैगरे कुठेही नाही. या सगळ्याबाबत निवणडुकीआधी बोलणं उचित नाही. पक्षाचे प्रमुख लोकं आहेत ते याबाबत ठरवतील.' असं मोठं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. ज्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण जर नारायण राणे हे लोकसभेसाठी तयार नसतील तर या मतदारासंघात नेमका कोणता उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा>> 'काँग्रेसशी नाळ तोडणं सामान्य माणसाला पटत नाही', अमित देशमुख स्पष्टच बोलले

देशवासियांचा मूड या निवडणुकीत मोदी की गॅरंटी हाच असेल. अबकी बार.. मोदी की गॅरंटी.. महाराष्ट्रात आम्ही 48 जागा जिंकायचा प्रयत्न करू. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यसभेसाठी पक्षाने उमेदवार दिले आहेत. ज्यांना उमेदवारी नाही मिळाली ते पण खुश आहेत.  अशोक चव्हाण येणार हे आमच्यासाठी चांगलं आहे ना.. कोणी येईल त्यांचं आम्ही स्वागत करतो. चांगली माणसं आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये यावं.. चांगले नसतील त्यांनी आहे तिथे राहावं.

'रिफायनरी मी रत्नागिरीतच आणणार..'

'रत्नागिरीत रिफायनरी येणार.. मी आणणार माझं बोलणं सुरू आहे मंत्र्यांशी ते संबंधित कंपन्यांशी बोलतायेत. रिफायनरी या रत्नागिरीत यावी मोठा रोजगार इथे तयार व्हावा. अनेक छोट्या-मोठ्या फॅक्टरी.. उद्योग, उद्योजक पण यावेत ते स्थानिक लोकांमधून असावेत असं मला वाटतं.' असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. 

ADVERTISEMENT

नारायण राणे नाराज?

राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे नारायण राणे हे नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. कारण जर त्यांना भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात उतरवलं तर राणेंसाठी काहीसं जड जाण्याची शक्यता आहे. कारण या लोकसभा मतदारसंघात भाजपची काहीशी ताकद असली तरी राणेंची वैयक्तिक ताकद ही पुरेशी नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'तेव्हा सांगतो कसा आहे अजित पवार', दादांची कोणाला धमकी?

नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांना सलग दोनदा याच मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. अशावेळी आता भाजपकडून खुद्द नारायण राणे यांनाच तिकीट देण्यात आलं तरी त्यांना विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागू शकतात. कारण या मतदारसंघातून शिवसेना (UBT) पक्षाचे विनायक राऊत हे सलग दोनदा खासदार म्हणून लोकसभेत गेले आहेत.

अशावेळी नारायण राणेंना जर या मतदारसंघात निवडणूक लढवावी लागली तर त्यांना विजयासाठी बरीच झुंज द्यावी लागू शकते. या सगळ्या राजकीय समीकरणांमुळे देखील राणे लोकसभा निवडणूक लढवण्यास नाराज असल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT