Exclusive Interview: राजीव गांधी ते मनमोहन सिंग… PM मोदी म्हणतात ‘हा’ देशातील सर्वात वाईट काळ!
PM Narendra Modi Exclusive Interview: स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय इतिहासात 30 वर्षांची मिश्र सरकारे हा देशासाठी अंधकाराचा काळ ठरला. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
PM Narendra Modi Exclusive Interview India Today: नवी दिल्ली: स्वातंत्र्यानंतर देशाच्या कोणत्या कालखंडाला इतिहासाचा काळा अध्याय म्हणता येईल? सामान्यतः बिगर काँग्रेस नेते आणीबाणीचा काळ हा देशासाठी सर्वात दुर्दैवी काळ मानतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे की, गेली 30 वर्षे (साहजिकच 2014 पूर्वीची 30 वर्षे) ही देशासाठी सर्वात दुर्दैवी होती. इंडिया टुडेचे ग्रुप एडिटर-इन-चीफ आणि अध्यक्ष अरुण पुरी, उपाध्यक्ष कली पुरी आणि समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा यांच्याशी खास संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या वर्षांत देशातील जनतेने मिश्र सरकारचा काळ पाहिला आहे. (pm modi exclusive interview rajiv gandhi to manmohan singh why does pm modi consider these 30 years as the worst period of the country)
याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मिश्र (मिली-जुली) सरकारांमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आम्ही 30 वर्षे वाया घालवली. मिश्र सरकारच्या काळात लोकांनी सुशासनाचा अभाव, तुष्टीकरणाचे राजकारण आणि भ्रष्टाचार पाहिला आहे. याचा परिणाम असा झाला की, लोकांची आशा आणि आत्मविश्वास गमावला आणि जगामध्ये भारताची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे साहजिकच भाजप ही लोकांची पसंती झाली.’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
या काळात देशाच्या शासनप्रणालीत आणि सरकारांमध्ये नेमकं काय घडले ते आपण पाहूया, ज्यामुळे पंतप्रधान मोदींनी या 30 वर्षांचा वारंवार उल्लेख केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
1984 ते 2014 पर्यंत राजकीय ऱ्हासाचा कालावधी
2014 पूर्वीचा 30 वर्षांचा कालावधी म्हणजे 1984 ते 2014 पर्यंतचा काळ. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान म्हणून दुसरा कार्यकाळ संपला. राजीव गांधींच्या काळात देशाची प्रचंड हानी झाली. पंजाब आणि काश्मीरपासून ईशान्येपर्यंत दहशतवाद फोफावला होता. राजीव गांधींनी पंजाब आणि आसामच्या दहशतवाद्यांशी चर्चा केली पण त्यांना यश मिळाली नाही आणि शेवटी त्यांना स्वत:चा जीव एका दहशतवादी हल्ल्यात गमावावा लागला.
हे ही वाचा>> Exclusive Interview: ‘…म्हणून BJP ने नवे मुख्यमंत्री निवडले’, PM मोदींनी सांगितली Inside स्टोरी
देशात संगणक आणण्याचं श्रेय हे राजीव गांधींना दिलं जातं, पण दूरदर्शी धोरणांअभावी आपल्याला हार्डवेअरचा राजा होण्यापासून रोखलं जातं. बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपांमुळे काँग्रेसच्या सरकारचं पतन झालं, त्यानंतर देशात अस्थिर सरकारांचे युग सुरू होते. व्हीपी सिंह अल्पमतात सरकार बनवतात, त्यानंतर चंद्रशेखर 4 महिन्यांसाठी पंतप्रधान बनले. 1991 मध्ये नरसिंह राव यांचे सरकार बनले जे 5 वर्षे टिकलं पण सरकार वाचवण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यानंतर ‘आया राम, गया राम’चे युग सुरू झाले. देवेगौडा, इंदर कुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी यांसारखे चेहरे पंतप्रधान पदी येत-जात राहिले, त्यानंतर वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सरकारे निर्माण झाली, पण पूर्ण बहुमत नसल्यामुळे ही मिश्र सरकारे त्यांना चालवावी लागली.
ADVERTISEMENT
या सरकारांना तग धरून ठेवणे हेच सर्वात मोठे काम होते. त्यामुळे देशाच्या विकासासाठी त्यांना दूरगामी काम करता आलं नाही आणि अनेक राजकीय संघर्ष निर्माण झाले.
ADVERTISEMENT
खराब कारभार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा काळ
पीएम मोदी म्हणतात की, ‘या 30 वर्षांत लोकांनी प्रशासनाचा अभाव आणि तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आहे. किंबहुना, सोप्या शब्दात सांगायचे तर, मिश्र सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची व्याप्ती लोकांनी पाहिली आहे. जगाच्या शर्यतीत आपला समावेश नाही हे लोकांच्या हृदयात रुजले. नरसिंह राव यांच्यावर सरकार वाचवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांवर लाच दिल्याचा आरोप झाला. सरकार वाचवण्यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचलेले.’
‘यूपीएच्या राजवटीत सत्ताकेंद्र कुठे आहे हे शोधणे अवघड होते. PM मनमोहन सिंग यांचा महत्वाकांक्षी कायदा हा राहुल गांधी यांनी फाडून फेकून दिला होता. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मुलायमसिंह यादव यांच्यावर दबाव टाकून सरकार अनेक वेळा वाचविण्यात आले. राजकीय पक्षांच्या कठीण अंतर्गत करारांमुळे हा संपूर्ण काळ लक्षात राहील.’ असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
‘तीस वर्षांत तांत्रिक महासत्ता निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही’
‘आज देश सेमीकंडक्टर चिप निर्मिती, अंतराळ संशोधन आणि इतर अनेक उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे. पीएम मोदी म्हणतात की, ही दुर्दैवाची गोष्ट आहे की, या 30 वर्षांपासून सत्तेत असलेले लोक केवळ सरकारे चालवत होते. देश सेमीकंडक्टर मिशन हे असे काहीतरी आहे जे आपण 30 वर्षांपूर्वी सुरू करायला हवे होते. आम्हाला आधीच उशीर झाला आहे. ते आमच्या क्षमतेवर शंका घेत राहिले. आपल्या देशातील लोकांमध्ये प्रचंड क्षमता आहे, मग ते संशोधन असो वा डिझाइन.’
‘अणुऊर्जा तसेच अवकाश क्षेत्रातही आपण मोठे यश संपादन केले आहे. संरक्षण उत्पादनातील आपल्या गतिशीलतेकडे जग आता पाहत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासारखी उत्पादने. माझा विश्वास आहे की, भारताकडे सर्व काही आहे. आमच्या धोरणांमुळे आणि प्रोत्साहनांमुळे आम्ही आमच्या सेमीकंडक्टरमध्ये मोठी झेप घेतली आहे.’ असा दावा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
हे ही वाचा>> Exclusive Interview: भारताला विकसित करण्यासाठी PM मोदींचा खास मंत्र, म्हणाले GYAN…
‘खरं तर, आपण तो काळ पाहिला आहे जेव्हा संपूर्ण बाजारपेठ चीनमधून बनवलेल्या वस्तूंनी भरलेली होती. भारतातील उत्पादनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. या 30 वर्षात आपण शेकडो वर्षे ज्या मालाचे उत्पादन करत होतो तोच आयात करू लागलो. चीनसारख्या जगाला माल पुरवठा करणाऱ्या साखळीचा विचार करायला देशात कुणालाही वेळ नव्हता.’ असा आरोपही मोदींनी यावेळी केला आहे.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, ‘या तीस वर्षांत सत्तेत असलेले लोक फक्त सरकार चालवत होते, देश नाही. किंबहुना यातील सत्यता नाकारता येणार नाही. देशाने अवघ्या 9 वर्षात जी प्रगती पाहिली आहे, ती पाहता ही बाब दिसते. संरक्षण क्षेत्रात आपण आयातदाराकडून निर्यातदार झालो आहोत. जगातील अनेक देश आपल्याकडून क्षेपणास्त्रे विकत घेत आहेत, काही वर्षांपूर्वीपर्यंत हातबॉम्बसाठीही आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून होतो.’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी युती-आघाडी सरकारांमुळे देशाचं नुकसान झाल्याचा दावा केला.
ADVERTISEMENT