Rajya Sabha 2024 : '...म्हणून पुन्हा अर्ज भरला', प्रफुल पटेलांनी सांगितलं वेगळंच कारण

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

प्रफुल पटेलांना राष्ट्रवादी काँग्रेसने का दिली उमेदवारी?
why ajit pawar ncp re nominate to praful patel for rajya sabha 2024
social share
google news

Praful Patel Rajya Sabha 2024 Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली. पण, यात चर्चा होतेय ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची. राज्यसभेतील खासदारकीचा चार वर्षाहून अधिक कार्यकाळ बाकी असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा प्रफुल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याबद्दल वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात असताना खुद्द प्रफुल पटेल यांनी भूमिका मांडली. (why ajit pawar's ncp are nominated to praful patel for rajya sabha 2024 election?)

प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्या सूचनेप्रमाणे मी माझा राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. राज्यसभेवर मी यापूर्वीही होतो." 

राज्यसभेसाठी प्रफुल पटेलांनी का भरला अर्ज?

पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुद्द्यावर पटेल म्हणाले, "माझी टर्म (कार्यकाळ) चालू असताना मी परत अर्ज भरला आहे. त्याविषयीही लोक तर्कविर्तक लावत आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही पण राजकीय जीवनात काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी कराव्या लागतात", असे सांगत प्रफुल पटेलांनी राजकीय इनकमिंग होण्याचे संकेत दिले.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रफुल पटेल पुढे बोलताना म्हणाले, "आमच्याकडेही खूप सारे इच्छूक लोक आजूबाजूला दिसत आहे. त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे. मला खात्री आहे, यावेळस बिनविरोध निवडणूक होणार आहे. नक्कीच आमची रिक्त असणारी जागा आमच्याकडेच राहणार आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

अपात्रतेच्या भीतीमुळे अर्ज भरला का?

या मुद्द्यावर बोलताना पटेल यांनी सांगितलं की, "येणाऱ्या काळामध्ये जे काही चित्र आहे, ते तुम्हाला स्पष्ट दिसेल. देशात यापूर्वी घडलं नाही, याचा अर्थ असा नाही... अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अशा नवीन गोष्टी घडत राहतील. अपात्रतेचा काही विषय नाही." 

ADVERTISEMENT

"आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मी राज्यसभेत जावं असा निर्णय केला. आमच्या पक्षात आणि इतरही पक्षात इच्छुक लोक असतात, सगळे योग्य असतात, पण सगळ्यांना संधी एकाच वेळी देता येत नाही. उरलेली जागाही आमच्या पक्षाकडे राहणार आहे. संधी राहणार आहे, त्यामुळे कुणीही तर्कविर्तक लावू नये", असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT