NCP : प्रफुल्ल पटेल शरद पवार आले एकत्र; फोटो बघून उंचावल्या भुवया

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

praful patel meets sharad pawar in new parliament, shares photos.
praful patel meets sharad pawar in new parliament, shares photos.
social share
google news

Praful Patel Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांनी पक्षातील आमदारांना सोबत घेऊन भाजप-शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. सत्तेत गेल्यावर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर त्यांच्यासोबत गेलेल्या 8 जणांना मंत्रीपदाचा लाभ झाला. नंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटांची चर्चा होऊ लागली. सुरुवातीला दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं. शिवाय पक्षात फूट असल्याचं मान्यही केलं नाही. मात्र हळूहळू दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफानी टीका करायला सुरुवात केली. इतकंच काय शरद पवारांवरही अजित पवारांसोबत गेलेल्या काही नेत्यांनी टीका केली. शरद पवार गटाकडून स्वत: पवारांसह अनेकांनी अजित दादा गटावर टीकेचे बाण सोडले आहेत.

असं सगळं असताना शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत, वेगवेगळे नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, या घटनेला जवळपास तीन महिने होत आले आहेत. असं असतानाही पवार काका-पुतण्या एकत्र असल्याची चर्चा होतच असते. आता यात आणखी भर पडली आहे.

हेही वाचा >> Women Reservation Bill : लोकसभा, विधानसभेच्या जागांचं समीकरण बदलणार; विधेयकात काय?

प्रफुल्ल पटेलांचं ट्विट

संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमावेळी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. अजित पवार समर्थक आमदारांसह भाजप सरकारमध्ये पर्यायानं एनडीएमध्ये सामील झाले. पवारांनी सोबत यावं, म्हणून ते दोनवेळा मंत्री आणि नेत्यांसह काकांना भेटले. मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विरोधी इंडिया आघाडीच्या बैठकीलाही पवार हजर राहिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

त्यांनी फोटो शेअर करत म्हटलंय “नवीन संसद भवनातील हा दिवस ऊर्जादायी आहे. राज्यसभेतील चेंबर अद्भुत आहेत आणि हा क्षण देखील. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनतो. सोबतच कॅफेटेरियामध्ये मित्रांसह स्नॅक्सचा आस्वाद घेतला. खरोखरच अविस्मरणीय असा दिवस आहे”, असं पटेल यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार-प्रफुल पटेल भेटीवर नेटकरी काय बोलले?

या फोटोवर प्रतिक्रियांही उमटल्या आहेत. गुरमीतसिंह गिल नामक एका युझरनं म्हटलं आहे की, “कार्यकर्त्यांनो या ट्विट वरून एक गोष्ट लक्षात घ्या. दादा, प्रफुल पटेल आणि आ. साहेब सर्वजण एकत्रच आहेत. साहेब गटाच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांची माथी भडकविणाऱ्या तरुण नेत्याचे ऐकून उठसूठ असभ्य भाषेत सोशल मीडियावर कमेंट, टीका व वाद करू नका.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘आत्मविश्वास गमावलेल्या…’, रुपाली चाकणकरांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंना डिवचले

तर प्रशांत भोसले यांनी म्हटलं आहे की, “साहेब अशी लोक जवळ घेऊ नका हो… हे सरळ सरळ जाहीर सभेत तुम्हाला नको ते बोलतात आणि तुमी यांना जवळ करतात… हे तुमच्या वर पुस्तक लिहून तुम्हाला बदनाम करायला तयार आहेत आणि तुम्ही यांना जवळ बसवुन परत एकदा धोका खायला तयार आहात का ? असल्याने लोक विश्वास ठेवणार नाहीत”, असं भोसले यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT