आंबेडकर नितेश राणेंवर भडकले,'वेडा आमदार समजून...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

Prakash Ambedkar Nitesh Rane
Prakash Ambedkar Nitesh Rane
social share
google news

Prakash Ambedkar: राज्यातील अनेक गोष्टींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांनाच (Police) त्यांनी एक आव्हान केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलून त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. 

माझे कितीही व्हिडीओ काढा

आमदार निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी म्हटलेले की, 'हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केले होते. 'माझे कितीही व्हिडीओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असं जाहीर सभेत त्यांनी वक्तव्य केले होते. ' 

वेडा आमदार

नितेश राणे यांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करत, मी काही चुकीचं बोललो नाही, मी हिंदूंची बाजू लावून धरतोय, मी काही चुकीचं करतोय का? असाही प्रतिसवाल नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना एक वेडा आमदार बोलतोय असं समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावं असा सल्लाह प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कारवाई करू नये

प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्याविषयी बोलताना सांगितले की, 'नितेश राणे यांच्या यांच्यावर कारवाई होऊ शकते, मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करावे व सोडून द्यावं.  एक वेडा आमदार, खासदार बोलतोय असं म्हणावं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं' असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला आहे.

लोकांवर परिणाम नाही

आमदार नितेश राणे यांच्या बोलण्याचा किंवा त्यांच्या बेताल वक्तव्याचा कोणताही परिणाम लोकांवर आणि समाजावर होत नाही. त्याकडे दुर्लक्ष करावं असा त्यांनी स्पष्टच सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> चिन्ह मिळाल्यानंतर आव्हाडांनी रणशिंगच फुंकले, 'वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT