Prakash Ambedakr : वंचितचं मविआसोबत का फिस्कटलं? आंबेडकरांनी सांगितलं कारण

योगेश पांडे

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला?
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत न जाण्याची भूमिका मांडली.
social share
google news

Prakash Ambedkar On Maha Vikas Aghadi, Lok Sabha election 2024 : जागावाटपावरून फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. महाविकास आघाडीसोबत नेमकी कोणत्या मुद्द्यावरून चर्चा फिस्कटली, याबद्दल अखेर प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर भाष्य केलं. आहे. (Prakash Ambedkar on Maha Vikas Aghadi)

नागपूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी आंबेडकर म्हणाले, "त्यांचं भांडण मिटत नव्हतं म्हणून वंचित आम्हाला जास्त जागा मागत आहे, असे नरेटिव्ह महाविकास आघाडीकडून सेट करण्यात येत होते. आम्ही खरगे यांना पत्र लिहून 7 जागांवर पाठिंबा जाहीर केला आहे. कोल्हापूर आणि नागपूर याठिकाणी आम्ही पाठिंबा दिला आहे."

विस्थापितांनासोबत घेण्याचा मुद्दा

आंबेडकर म्हणाले, "प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं, विस्थापितांचं राजकारण... आम्ही असं म्हणत होतो की, प्रस्थापित आणि वंचितांचा समन्वय आपण या निवडणुकीत करूया. पण, याला या तिन्ही पक्षांचा नकार होता. म्हणून आम्ही (वंचित बहुजन आघाडी) बाहेर पडणार कसं, या दृष्टीने दोन किंवा तीन जागा देतो, अशी सुरुवात केली." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

...म्हणून मला पाच मिनिटं दिली -आंबेडकर

"या तिन्ही पक्षांना वंचितची दुसरी अडचण जी होती, ती मुंबईमध्ये. मुंबईच्या सभेत सगळ्यांना दिसलं की, आमचं मोदींशी भाडणं नाही, अदृश्य शक्तीशी भांडण आहे. निवडणुकीत जो पक्ष आहे, त्या पक्षाला तुम्हाला अंगावर घ्यावं लागतं. त्याच्यावर टीकेचे शस्त्र करावं लागतं. त्याचा दहा वर्षांचा कारभार कसा लोकांसाठी हितकारक नाही, हे मांडणार आहे. त्या सभेत मी अनेक गोष्टी मांडू शकतो आणि अडचण होईल म्हणून मला पाच मिनिटं दिली. मला त्याबद्दल म्हणणं नाही. ती राहुल गांधींची सभा होती. त्यांना अधिक वेळ मिळाला पाहिजे, याची मला जाणीव आहे", असे आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा >> सांगलीची जागा काँग्रेसला देणार?; ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका  

"विस्थापितांना सत्तेत घेण्याला प्रस्थापितांचा विरोध राहिलेला आहे. प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला आहे. भाजप ताब्यात घेतला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना ताब्यात घेतलेली आहे. यांचे निवडून आलेले खासदार, आमदार बघितले तर ते एकमेकांशी निगडती आहेत. आमचे उमेदवार विस्थापित समुदायातील आहेत", असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.  

ADVERTISEMENT

पहा प्रकाश आंबेडकर यांची संपूर्ण पत्रकार परिषद

हेही वाचा >> महायुती सरकारचं टेन्शन वाढलं! जरांगे पाटलांची मोठी घोषणा

"आमचा आग्रह असा होता की, या विस्थापितांना बरोबर घेऊन आपण सत्तेत गेले पाहिजे, पण दुर्दैवाने आमची संकल्पना मान्य तर झालीच नाही, पण त्यांच्यातीलच भांडणं मिटली नाही. निवडणूक जवळ आली आणि आम्ही जी तयारी केली, त्या जोरावर आम्ही उभं राहत आहोत. अनेक मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत", असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT