MVA : "...तर महाविकास आघाडी तुटली असती", पृथ्वीराज चव्हाणांचे विधान
Prithviraj Chavan: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी झालेल्या घडामोडींबद्दल भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पृथ्वीराज चव्हाण यांचे महाविकास आघाडीबद्दल विधान
लोकसभा जागावाटपावेळी काय घडलं होतं?
काँग्रेसने मविआसाठी कुठे कुठे त्याग केला?
Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. सांगली, भिवंडी या लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना (युबीटी), काँग्रेस विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात बराच काळ चर्चेचे गुऱ्हाळ चालले. आता या काळात महाविकास आघाडीत घडलेल्या घडामोडींबद्दल माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे विधान केले. (Prithviraj Chavan said that had the Congress not compromised, the Mahavikas Aghadi would have broken up)
पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलभिडू या प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, "एका-एका घटकाने मोदींना हरवले. शेतकरी, बेरोजगार, दलित समाज ज्यांना वाटलं की, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदललं जातंय. त्यांनी हरवले. सगळ्या घटकांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव केला. नरेंद्र मोदींचा पराभव केला."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी तुटली असती -चव्हाण
"आमची काही विशेष रणनीती होती, असे काही म्हणता येणार नाही. आम्ही बराचसा नाजूक... खूप ताणले गेले होते सांगलीच्या बाबतीमध्ये. आम्ही जर कडक भूमिका घेतली असती, तर कदाचित ते (महाविकास आघाडी) तुटले असते", असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
हेही वाचा >> '... तर 1500 रुपये खात्यातून परत घेईन', नव्या वादाला फुटलं तोंड
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, "दिल्लीतून आग्रह होता की, तुम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी कायम ठेवा. एखादे पाऊल मागे टाकावे लागले, तर घ्या. आणि आम्ही पाऊल मागे घेतले आणि ही मजबूत ठेवली."
ADVERTISEMENT
आघाडी करणे आवश्यक होते; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय बोलले?
"राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा एक माजी आमदार माणूस घेतला. आम्ही मान्यता दिली. हरकत नाही. तुम्ही जागा घेतली, तुमच्याकडे माणूस नाही. भिवंडीच्या जागेवर खूप वाद झाला. ती आमची हक्काची जागा होती, तरी आम्ही शेवटी ती सोडली", असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? भुजबळांनीच सुचवला पर्याय
"सांगलीचे आपण सगळे बघितले आहे. मुंबई दक्षिण मध्य जागा आम्हाला दिली असती, तर आम्ही त्यांना उत्तर मुंबईची जागा द्यायला तयार होतो. ते चांगल्या प्रकारे लढू शकले असते. अशा काही गोष्टी घडल्या. आम्ही निश्चितच एखादे पाऊल मागे घेतले. कारण ही आघाडी करणे आवश्यक होते. आता सगळ्यांना त्या तीन पक्षाच्या आघाडीचा आणि मताचे विभाजन न होऊ देण्याचा फायदा दिसतोय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी होऊ न देता तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील", असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
ADVERTISEMENT