राष्ट्रवादी की काँग्रेस, पुण्यात वरचढ कोण; आकड्यात समजून घ्या कुणाची ताकद जास्त?
पुणे लोकसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करत आहे. काँग्रेसने पारंपरिक मतदारसंघ देण्यास नकार दिला आहे. त्यावरून महाविकास आघाडीत सध्या वाद निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT

Lok Sabha Bypoll, Maha Vikas Aghadi : पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरुन सध्या मविआमध्ये रच्चीखेच होत असल्याचं दिसून येतंय. एकीकडे पुणे हा आमचा पारंपारिक मतदारसंघ आहे, असं म्हणत काँग्रेस या जागेवर आपला दावा काम ठेवताना दिसतीये तर दुसरीकडे पुण्यात आमची ताकद जास्त असल्याचं म्हणत राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी पुण्यात कोणाची किती ताकद आहे आणि या जागेवर दावेदार नेमके कोण आहेत हेच समजावून घेऊयात…
गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. एखादी जागा रिक्त झाली तर त्या ठिकाणी 6 महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते. पुणे लोकसेभेची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता पुण्याच्या जागेवरुन मविआमध्ये चढाओढ लागली आहे. काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे, तर अजित पवारांनी आमदार, नगरसेवकांचं गणित सांगत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची तयारी सुरु केली आहे.
संजय राऊतांची मध्यस्थी
आता या सगळ्या वादात संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. एका बातमीचा आधार घेत राऊतांनी ट्विट करत संविधान आणि लोकशाहीसाठी त्याग करावा लागेल असं म्हंटलं आहे. राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरले तर कसबा प्रमाणे पुणे लोकसभा पोट निवडणूक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल ! जय महाराष्ट्र !’
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस… पुण्यात कुणाची ताकद?
पुण्याच्या जागेवरुन वाद सुरु असताना पुण्यात कोणाची किती ताकद आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात पुणे शहर आणि हवेली तालुका येतो. पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 च्या निवडणुकीनुसार राष्ट्रवादीचे 39 नगरसेवक होते, काँग्रसचे 9 होते तर शिवसेनेचे 10 नगरसेवक होते.