शरद पवारांची अदाणींसाठी बॅटिंग, राहुल गांधींचंही प्रत्युतर… पण वेगळ्याच स्टाइलमध्ये!

मुंबई तक

राहुल गांधी यांनी एक फोटो शेअर करून अदाणींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. या एकाच फोटोतून त्यांनी अनेक नेत्यांवर निशाणा तर साधलाच आहे. पण शरद पवारांना देखील अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

rahul gandhi again attack on adani
rahul gandhi again attack on adani
social share
google news

मुंबई: अदाणी आणि मोदींचं नातं काय? असा प्रश्न करून राहुल गांधींनी लोकसभेत हल्लाबोल केला होता. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनच अदाणींवरून पाण्यात वाहून गेलं. त्याच अदाणींच्या मुद्यावरून शरद पवारांनीही विरोधी पक्षांना खडेबोल सुनावले. पवारांनी अदाणींवरून अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना सुनावल्याचं म्हटलं गेलं. त्याचवेळी आता राहुल गांधींचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी नेमकं काय म्हणालेत आणि त्याचं टायमिंग काय सांगतं, हे आपण सविस्तर पाहूयात. (rahul gandhi again attack on adani and answered to sharad pawar but in a different style)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीटीव्हीला दिलेली मुलाखत शुक्रवारी 7 एप्रिलला रोजी प्रकाशित झाली. याच मुलाखतीनंतर महाराष्ट्रचं नाही, तर देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झालं. पवारांनी अदाणी वादावर सविस्तर भूमिका मांडली. विरोधी पक्षांनी अदाणींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली. पण सरकारने ही मागणी मान्य केली नाही. याबद्दलच शरद पवार म्हणाले, जेपीसीत बहुमताच्या आधारावर निर्णय होतो. तिथे सत्ताधाऱ्यांचं बहुमत असतं. त्यामुळे पारदर्शकपणे निर्णय होण्याची शक्यता नसते. म्हणूनच जेपीसीऐवजी सुप्रीम कोर्टाच्या समितीनं चौकशी करणं अधिक योग्य असल्याचं माझं म्हणणं आहे.

अधिक वाचा- अदाणींची पाठराखण करताच गदारोळ, शरद पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद; म्हणाले…

तसंच अदाणी-अंबानींवर आरोप करणाऱ्यांनाही पवारांनी खडे बोल सुनावले आहेत. आता याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवारांच्या मुलाखतीनंतर राहुल गांधींचं अदाणींविरोधात ट्विट

राहुल गांधी लिहितात, ‘सच्चाई छुपाते हैं, इसलिए रोज़ भटकाते हैं! सवाल वही है – अडानी की कंपनियों में ₹20,000 करोड़ बेनामी पैसे किसके हैं?’

हे वाचलं का?

    follow whatsapp