Nitish Kumar : राहुल गांधींचा नितीश कुमारांवर निशाणा, ‘थोडासा दबाव पडताच…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rahul gandhi break silence criticized nitish kumar joining nda bihar political crisis
rahul gandhi break silence criticized nitish kumar joining nda bihar political crisis
social share
google news

Rahul Gandhi Criticized Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयुचे अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडीला धक्का देऊन पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर राजद, सपा आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी नितीश कुमारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. थोडासा दबाव येताच त्यांनी यु-टर्न (नितीश कुमार) घेतला. पण दबाव कोणता? कारण आमची इंडिया आघाडी त्या मुद्यांना उचलून धरत होती जे सर्वसामान्यांच्या हिताचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. (rahul gandhi break silence criticized nitish kumar joining nda bihar political crisis)

राहुल गांधी यांनी यावेळी एक किस्सा देखील सांगितला. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा अखिलेश यादवचे भाषण सुरु होते, त्यावेळेस बघेल यांनी मला एक किस्सा सांगितला. तुमच्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबतचा हा किस्सा आहे. तुमचे मुख्यमंत्री शपथ घेण्यासाठी राज्यपालांकडे गेले होते. तिकडे खूप मोठा जल्लोष सुरु होता. भाजप नेता आणि राज्यपाल बसले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची आणि मंत्रिपदाची शपथ घेतली जाते. या शपथ विधीनंतर ते मुख्यमंत्री निवासस्थानी निघून जातात. गाडीत बसल्यावर त्यांना कळतं की ते राज्यपालांच्या निवासस्थानी ते शाल विसरतात. त्यानंतर मुख्यमंत्री ड्रायव्हरला पुन्हा राज्यपालांच्या निवासस्थानी गाडी नेण्यास सांगतात. जसे ते राज्यपालांच्या निवासस्थानी पोहोचतात आणि दरवाजा उघडल्यावर राज्यपालांना त्यांना म्हणतात, अरे इतक्या लवकर आलात? अशी अवस्था सध्या बिहारची आहे. थोडासा दबाव पडताच यु-टर्न घेतात.

हे ही वाचा : आधी मुख्यमंत्र्याचा फोन टाळला, आता वडेट्टिवारांच्या भेटीला, किरण सामंतांचं नेमकं चाललंय काय?

यावेळी नितीश कुमार हे भाजपच्या जाळ्यात कसे अडकले याची कारण देखील राहुल गांधी यांनी सांगितले. मी त्यांना सरळ म्हटलं की जातनिहाय जणगणना करावी लागेल. आणि आम्ही आरजेडीसोबत मिळून नितीश कुमारांसह सर्वे करण्यावर जोर दिला होता. यामुळे भाजप घाबरली आणि कारण ती या जनगणनेच्या विरोधात होती. यामुळे नितीश कुमार देखील फसले आणि पळवाटासाठी भाजपने त्यांच्यासाठी मागचे दार उघडलं. पण लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमच्या आघाडीची आहे आणि त्यासाठी आम्हाला नितीशजींची गरज नाही, असे देखील राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Rajya Sabha Election 2024 : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT