Rahul Gandhi News: खासदारकी गमावणारे राहुल गांधी पहिले नाहीत, दिग्गज नेत्यांवर झालीये कारवाई, कोण आहेत ते नेते?

मुंबई तक

ADVERTISEMENT

खासदारकी गमावणारे राहुल गांधी पहिले नाहीत, दिग्गज नेत्यांवर झालीये कारवाई,
खासदारकी गमावणारे राहुल गांधी पहिले नाहीत, दिग्गज नेत्यांवर झालीये कारवाई,
social share
google news

Rahul Gandhi disqualified from membership of lok sabha : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. संसद सचिवालयाने या संदर्भात नोटीफीकेशनही जारी केले आहे. राहुल गांधी यांना मोदी आडनाव (Modi Surname Case) प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी जाणार की राहणार असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर लोकसभा अध्यक्षांनी यावर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या आधी अनेक नेते ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत, हे नेते कोण आहेत ? हे जाणून घेऊयात.(rahul gandhi disqualified as mp from lalu yadav to jayalalitha these mps and mlas disqualified from past)

ADVERTISEMENT

लालू यादव

माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) यांना 2013 ला चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली होती. या शिक्षेनंतर त्याची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

आजम खान

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आजम खान (Ajam Khan) यांना गेल्या वर्षी हेट स्पीच प्रकरणात शिक्षा झाली होती.यानंतर रामपुर सदर भागातून त्यांची खासदारकी रद्द झाली होती.

हे वाचलं का?

जयललिता

तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता (jayalalithaa) यांची दोनदा खासदारकी रद्द झाली होती. 2002 साली भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना शिक्षा झाली होती. त्यानंतर 2014 साली बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा झाली होती. या दोन्ही प्रकरणात त्यांची खासदारकी रद्द झाली होती.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी गेली, काँग्रेसला झटका; लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई

कुलदीप सिंह सेंगर

उन्नावचे भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांना तीन वर्षापुर्वी बलात्कार प्रकरणात शिक्षा झाली होती. या शिक्षेनंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते.

ADVERTISEMENT

उत्तरप्रदेशमध्ये ‘या’ नेत्यांची आमदारकी रद्द

उत्तरप्रदेशमध्ये 2013 मध्ये कॉग्रेसचे राज्यसभेचे खासदार रशीद मसूद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा झाली होती. तर 2015 मध्ये भाजपचे बजरंग सिंह यांची आमदाकी रद्द झाली होती. तसेच आजम खान यांच्या मुलाला एका केसमध्ये 2020 मध्ये दुसऱ्या केसमध्ये 2022 साली शिक्षा झाली होती. यासह भाजपचे विक्रम सोनी, खब्बू तिवारी आणि अशोक चंदेला यांनी आमदारकी गमवावी लागली होती.

ADVERTISEMENT

Sharad Pawar: राहुल गांधींना झालेली शिक्षा हेच अधोरेखित करतेय; न्यायालयाच्या निकालानंतर पवारांनी व्यक्त केली चिंता

बिहारचे ‘हे’ नेते अपात्र

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक नेत्यांना शिक्षा झाली होती.यामध्ये जगदिश शर्मा यांना सुद्धा शिक्षा झाली होती. तसेच वेगवेगळ्या प्रकरणात आरजेडीचे अनिल कुमार साहनी, अनंत सिंह, राज बल्लभ यादव आणि इलयास हुसैन यांच्यावर अपात्रतेची कारवाईमुळे अपात्र ठरले होते.

हरियाणात ‘या’ नेत्याची आमदारकी रद्द

हरियाणाचे कॉंग्रेसचे आमदार प्रदिप चौधरी यांना 2021 रोजी दंगलीशी संबंधित प्रकरणात शिक्षा झाली होती. केरळचे cpm के जी जयराजन यांना 2001 मध्ये निवडणूकीच्या नियमांचे उल्लंघन तर ए. राजा यांनी निवडणूकीत फ्रॉंड केल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. यासोबतच पीसी थॉमस आणि केएम शाजी यांना शिक्षा झाल्याने आमदारकी रद्द करण्यात आली होती.

Rahul Gandhi : ‘तो’ अध्यादेश फाडला अन् 10 वर्षांनी खासदारकी आली धोक्यात

झारखंडमध्ये ‘या’ नेत्याची आमदारकी गेली?

AJSU पक्षाचे के के भगत यांना 2015 तर JNM चे अमित महतो आणि योगेंद्र महतो यांना 2018 ला शिक्षा झाली होती. झारखंड पार्टीचे एनोस एक्का यांना 2018 ला शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी बंधु तिर्की आणि ममता देवी यांना शिक्षेनंतर अपात्र ठरवण्यात आले होते.

तमिळनाडूचे ‘हे’ नेते अपात्र?

तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्यासह AIADMK चे आमदार टीएम सेल्वसंगपती यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा झाली होती. तर 2019 ला भाजपच्या के पी बालकृष्ण रेड्डीवला शिक्षा झाली होती.

कर्नाटकमध्ये दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द

कर्नाटक राज्यात दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. 1973 ला निवडणूक नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी वतल नागराजला अपात्र ठरवण्यात आले होते. 2002 मध्ये भाजपच्या सुभाष कल्लूर यांना अपात्र ठरवण्यात आले होते.

दरम्यान राजकिय वर्तुळात हे काही नेते आहेत ज्यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी आणि खासदारकी रद्द झाली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT