Mla Disqualification : “…तर हा प्रसंग आला नसता”, नार्वेकरांचा संताप; ठाकरेंना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिलं. नार्वेकर काय म्हणाले ते वाचा…
ADVERTISEMENT
Rahul Narvekar uddhav Thackeray Shiv Sena Mla Disqualification : शिवसेनेतील फुटीवर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गट मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला. त्याचबरोबर व्हीप बजावले, पण संबंधित आमदारांपर्यंत ते पोहोचल्याचे सिद्ध होत नाही, असे सांगत त्यांनी १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाही फेटाळून लावली. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. नार्वेकरांच्या निकालाबद्दल उद्धव ठाकरे खुली पत्रकार परिषदही घेणार आहेत. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना लक्ष्य केले जात आहे. यावर आता नार्वेकरांनी ठाकरेंना स्पष्ट शब्दात सुनावलं.
ADVERTISEMENT
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकाल दिल्यापासून ठाकरेंची शिवसेना, विरोधी पक्षातील नेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहे. भाजपधार्जिणा निकाल नार्वेकरांनी दिला. कायदेशीर प्रकरणावर राजकीय निकाल दिला, अशी टीका होत आहे. उद्धव ठाकरेंनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
राहुल नार्वेकरांनी ठाकरेंना काय दिलं उत्तर?
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिलं. नार्वेकर काय म्हणाले ते वाचा…
हे वाचलं का?
हेही वाचा >> “…तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का?”, गुलाबराव पाटलांचा भाजपला रोकडा सवाल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका मुलाखतीत म्हणाले की, “आमदार अपात्रतेचा निकाल कुणाला संतुष्ट करण्यासाठी दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहुनच निकाल दिला आहे. आता त्याविरोधात घटनेनुसार कोणताही नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो.”
हेही वाचा >> “मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, सदाभाऊंनी भाजपवर काढली भडास
“उद्धव ठाकरे यांच्या गटाने निकालाविरोधात याचिका दाखल केली म्हणजे निकाल चुकीचा ठरत नाही. निकालात काय चुकीचे आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. माझ्या निकालावर बोलण्यापेक्षा त्यांनी घटना दुरुस्तीकडे लक्ष दिले असते, तर बरे झाले असते”, अशा खोचक शब्दात नार्वेकरांनी ठाकरेंना उत्तर दिले.
ADVERTISEMENT
“वेळेत घटना दुरुस्ती केली असती तर…”
नार्वेकर “२०१८ मध्ये खरंच शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती का? त्यांनी (ठाकरे गट) दिलेली घटना ग्राह्य धरायची की शिवसेनेने १९९९ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेली घटना ग्राह्य धरायची? २०१३ मध्ये झालेल्या पक्षप्रमुखपदाच्या निवडीचा इथे विषयच नाही. त्यांनी (ठाकरे शिवसेना) माझे फोटो दाखवण्यापेक्षा, मी कुठे होतो याचे व्हिडीओ दाखवण्यापेक्षा वेळेत आणि खरोखर घटना दुरुस्त केली असती आणि ती आम्हाला दाखवली असती तर तुमच्यावर हा प्रसंगच आला नसता”, असा खोचक टोला नार्वेकरांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT