रायगडमध्ये भाजपचे बेरजेचं राजकारण! सुनील तटकरेंविरुद्ध पाटलांना ‘ताकद’?

मुंबई तक

ADVERTISEMENT

raigad loksabha election predicted that dhairyashil patil will enter the election against Sunil Tatkare
raigad loksabha election predicted that dhairyashil patil will enter the election against Sunil Tatkare
social share
google news

Maharashtra politics news : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूकीसाठी प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षाने आपआपला उमेदवार देखील निश्चित करायला सुरुवात केली आहे. त्यात भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविरोधात भाजपचे धैर्यशील पाटील (Dhairyashil Patil) मैदानात उतरण्याची शक्यता आहे. धैर्यशील पाटील हे शेकापचे माजी आमदार आहेत. दोन महिन्यापुर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सुनील तटकरे विरोधात ते निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे असे झाल्यास महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. (raigad loksabha election predicted that dhairyashil patil will enter the election against Sunil Tatkare)

ADVERTISEMENT

पक्षप्रवेशाचा धडाका

महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार जागा ज्या त्या पक्षासाठी सोडण्याचे निश्चित असल्याने लोकसभेसाठी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच निवडणूकीच्या रिंगणात असतील हे निश्चित झाले आहे. त्यात भाजपने ही जागा बळकावण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून रायगडमधील प्रत्येक पक्षातील व्यक्ती गळाला लावायला सुरूवात केली होती. याचाच एक भाग म्हणून शेकापचे पेण येथील माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी दोनच महिन्यापुर्वी भाजपचे कमळ हाती घेतले होते. तत्पुर्वी खासदार तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांना पक्षात घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्ष गीता पालेरचा आणि शेकापचे दिलीप भोईर यांच्यासह अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला होता.

शेकाप निकाल फिरवणार?

महाविकास आघाडीत शेकापचाही समावेश आहे. मात्र सुनील तटकरे यांच्याकडून फारसे काही सहकार्य मिळत नसल्याने शेकापमध्ये नाराजी आहे. त्यात आता आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेत सहकार्य न करणाऱ्या राष्ट्रवादीला मदत करण्याऐवजी शेकाप सहानुभूती म्हणून धैर्यशील पाटील यांना मदत करण्याची शक्यता आहे. याचाच फायदा भाजपला होऊ शकतो.

हे वाचलं का?

तर तटकरेंना होणार फायदा

दरम्यान 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना 4 लाख 86 हजार 969 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात विजयाची हॅट्ट्रीक साधण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे (UBT) अनंत गिते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळाली होती. त्यामुळे अवघ्या 31 हजार 439 मतांनी गिते यांचा पराभव झाला होता. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आहेत.त्यामुळे जर सुनील तटकरे लोकसभेची निवडणूक लढले तर त्यांना राष्ट्रवादीसह शिवसेनेची मते मिळू शकतात. अशा पद्धतीने त्यांचा सहज विजय होऊ शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT