Raj Thackeray: ‘खोके-खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर…’, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

raj thackeray criticized shiv sena ubt uddhav thackeray over 50 khoke and shinde rebellion mlas maharashtra politics update
raj thackeray criticized shiv sena ubt uddhav thackeray over 50 khoke and shinde rebellion mlas maharashtra politics update
social share
google news

Raj Thackeray vs Uddhav Thackeray: पनवेल: ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत.’ असे अत्यंत गंभीर आरोप मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहेत. शिंदे गटातील समर्थक आमदार यांच्यावर ठाकरे गटाकडून सातत्याने खोके सरकार अशी टीका केली जात आहे. मात्र, याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. ते पनवेलमध्ये पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते. (raj thackeray criticized shiv sena ubt uddhav thackeray over 50 khoke and shinde rebellion mlas maharashtra politics update)

‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राज ठाकरेंची घणाघाती टीका, पाहा शिवसेना (UBT)वर काय केले आरोप

▪️ जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर ह्याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

▪️ २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.

▪️ गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही.

ADVERTISEMENT

▪️ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री.

ADVERTISEMENT

▪️ ३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं.

हे ही वाचा >> Mumbai:चिकन थाळीत शिजलेला उंदीर,वांद्रेच्या ढाब्यातील धक्कादायक प्रकार

▪️ पण तुम्ही कश्मीर असो, हिमाचल असो की आपल्या ईशान्य भारतातील राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली ?

▪️ शिवडी-न्हावाशेवा रस्ता होणार तेव्हा बघा रायगड जिल्ह्याची काय अवस्था होते. तिथल्या जमिनी आधीच परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत आणि पुढे जाऊ परिस्थिती अशी होणार कि फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार.

▪️ मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात माझा मंडणगडचा तालुकाध्यक्ष तर एक शीख सरदार आहे.

▪️ अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं?

हे ही वाचा >> “मला चेकमेट करण्याचा…”, अजित पवार-शरद पवारांची भेट, शिंदेंचं सूचक विधान

▪️ अमेरिकेत १९२७ च्या महामंदीच्या काळात सरकारने लोकांना पैसा देता यावं म्हणून अमेरिकेत रस्त्यांचं जाळं उभारलं, त्याच्यावर आजची अमेरिका उभी राहिली.

▪️ माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे.

▪️ ह्या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT