Raj Thackeray: ‘मोदींनी आरोप करताच 6 दिवसात अजित पवार..’, राज ठाकरे बरसले

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj Thackeray criticized to ajit pawar said he is came to power in 6 days as soon as pm modi made allegations of corruption of 70 thousand crores
raj Thackeray criticized to ajit pawar said he is came to power in 6 days as soon as pm modi made allegations of corruption of 70 thousand crores
social share
google news

Raj Thackeray MNS : कृष्णा पांचाळ, पिंपरी-चिंचवड: ‘अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत गेले याची चीड यायला हवी. पंतप्रधान आठवडाभरपूर्वी काहीतरी बोलतात, त्याचे पडसाद उमटतात. अजित पवार थेट शपथविधी घेतात.’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी भाजप (BJP) आणि अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. (raj Thackeray criticized to ajit pawar said he is came to power in 6 days as soon as pm modi made allegations of corruption of 70 thousand crores)

राज ठाकरेंचं घणाघाती भाषण जसंच्या तसं…

सध्याची देशभरातील पत्रकारितेची परिस्थिती कशी आहे, हे पाहता आत्ता पुरस्कार देताना मला जाणवलं की आज ही पत्रकारिता जिवंत आहे. म्हणूनच मी आज मनसे अध्यक्ष म्हणून नव्हे तर पत्रकार राज ठाकरे म्हणून उपस्थित आहे.

मार्मिक ते आजपर्यंतची पत्रकारिता मी स्वतः पाहत आलोय.व्यंगचित्रकार आणि पत्रकार हे एकच आहे. मी राजकारण आणि पत्रकारिता दोन्ही पाहत आलोय. त्यामुळं आज पत्रकारांवर होणारे हल्ले हे नक्कीच निषेधार्ह आहे. पण ट्रोल वगैरे करणे, मुळात हे तुम्ही वाचताच कशाला? एकदा माझा कार्यक्रम, बोलणं संपलं की मी पुन्हा कमेंट्स पाहत नाही.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची.. ‘सामना’तून फडणवीसांना घायाळ करणारी टीका

मग तुम्ही कशाला पाहता, हे मोबाइल म्हणजे रिकम्यांचा धंदा. राजकारण्यांनी तर यासाठी विशेष लोकं पाळलेली आहेत. त्यामुळं तुम्ही याकडे लक्ष देणे बंद करावं. ज्यांना ज्ञान नाही, त्यांना कशाला सिरीयस घ्यायचं.

सध्या अनेक पत्रकार तर बिनकामाचे आहेत. ते मुख्य हुद्द्यावर ही आहेत. नागपूरला गेलो तेव्हा मला लाज वाटली. पत्रकारांना विचारलं तर म्हणाले मी या मंत्र्यांकडे, तो त्या मंत्र्यांकडे. आता पत्रकार मंत्र्यांकडे कामाला आहेत. आधी हे लपूनछपून चालायचं, आता उघडपणे पत्रकार मंत्र्यांकडे कामं करतात. त्यामुळं पुढचा परिसंवाद हा पत्रकारिता सुधारावी यासाठी घ्यायला हवं. ग्रामीण भागातील पत्रकारांकडे तर विषयच नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पत्रकार मला म्हणतात, तुमच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. मला सांगा, 2009 ते आजवर माझ्या उमेदवारांना मतं कुठून मिळतात. काय रतन खत्रीने आकडे काढले होते का? सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो. सत्ता हातात आली की ते जायला सुरू होते. विरोधी कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हारत असतो.

आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का? राज ठाकरे आहे मी, हे मी खपवून घेणार नाही. मी यावर व्यक्त होणारच. ब्ल्यू प्रिंट त्याचंच एक जिवंत उदाहरण. मी ती सादर केली त्यानंतर कोणी ती ब्ल्यू प्रिंट पाहिली नाही. फक्त मला हिणवलं गेलं. कोणी तरी सुपारी दिली की हे पत्रकार मला येऊन विचारणार. आता मला सांगा पत्रकार हल्ला ठीक आहे, तुमच्यावर हल्ला झाला की जसं वाईट वाटतं, तसंच आम्हाला ही वाटतं. तुमचं काम आमचे डोळे उघडणे, समाजाला दिशा दाखवणे, प्रबोधन करणे हे आहे. पण जाणीवपूर्वक काहीही ठरवून बातम्या देणे हे तुमचं काम नाही. पत्रकारांना काही बोललं की त्यांच्या कुटुंबीयांना वाईट वाटतं, मग राज ठाकरेंबाबत काही बोलल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना वाईट वाटत नसेल का? म्हणजे तुमचं ते कुटुंब अन आमचं काय? याचं भान पत्रकारांनी ठेवायला हवं.

अजित पवार सत्तेत गेले याची चीड यायला हवी. पंतप्रधान आठवडाभरपूर्वी काहीतरी बोलतात, त्याचे पडसाद उमटतात. अजित पवार थेट शपथविधी घेतात. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते वाट्टेल ते बोलतात अन पत्रकार तिथं हसतात. ही काय पत्रकारिता आहे? पूर्वी असं काही घडलं की पत्रकार फटकरायचे, सळो की पळो करून सोडायचे. पण आता असं काही घडत नाही.

‘नको त्या बातम्या करणाऱ्या पत्रकारांवर तुमची संघटना काय कारवाई करणार आहात का? हे सांगावं. बाकी इतर बाबतीत राज ठाकरे तुमच्यासोबत आहे.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT