Ramdas Kadam : 'कोण रविंद्र चव्हाण? दापोलीत येऊन...', कदमांचा पुन्हा भाजपवर 'वार'
Ramdas Kadam Criticize Bjp : होय शिंदेसाहेब,आपली संख्या कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री केले, पण जहाल शिवसेनेला 40 आमदार, 13 खासदार, 10 पक्ष घेऊन उद्धव ठाकरे सारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचे काम फक्त एकनाथ शिंदेचं करू शकतात.
ADVERTISEMENT
Ramdas Kadam Criticize Bjp, Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्तारुढ महायुतीच्या जागावाटपावर चर्चा सूरू आहे. या जागावाटपात शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून रामदास कदमांनी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. असे असताना आज पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवलाय. कोण रविद्र चव्हाण, कोण तो केळकर, कोण तो गोव्याचा मुख्यमंत्री दापोलीत जाऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर अधिकार सांगतो, अशी टीका रामदास कदमांनी (Ramdas Kadam) भाजपवर केली आहे. (ramdas kadam criticize bjp devendra fadnavis maharashtra politics eknath shinde group maharashtra politic)
ADVERTISEMENT
दापोलीत आयोजित सभेत रामदास कदम बोलत होते. यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले की, दापोलीच्या नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत होता. पण उद्धव ठाकरेंनी योगेश कदमला बाजूला करून राष्ट्रवादीच्या हातात नगरपरिषद दिली, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी ठाकरेंवर केला.
हे ही वाचा : Opinion Poll 2024 : सुप्रिया सुळेंची जागा धोक्यात, 'या' पोलने वाढवलं टेन्शन!
रामदास कदम पुढे म्हणाले, मी मध्ये जे बोललो ते भाजपच्या बाबतीत बोललो नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत बोलेलो नाही, असे रामदास कदमांनी यांनी स्पष्ट केले. दरम्यान त्यावेळेला उद्धव ठाकरेंकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न चालला होता.आज युती असताना इथल्या भाजपकडून शिवसेना संपण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोण तो रविद्र चव्हाण? इकडे येतो 10-15 कोटीची कामं घेतो. कोण तो भाजपचा आमदार केळकर? तो इकडे स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून भूमिपूजन करतो. कोण तो गोव्याचा मुख्यमंत्र? दापोलीत येऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर अधिकार सांगतो. चाललंय काय तुमचं, असा खडा सवाल रामदास कदमांनी भाजपला केला आहे.
हे वाचलं का?
'आम्ही 115 आहोत तरी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं, असं प्रत्युत्तर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांच्या टीकेवर दिले होते. यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, होय शिंदेसाहेब,आपली संख्या कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री केले, पण जहाल शिवसेनेला 40 आमदार, 13 खासदार, 10 पक्ष घेऊन उद्धव ठाकरे सारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचे काम फक्त एकनाथ शिंदेचं करू शकतात.
हे ही वाचा : 'गुवाहाटीसाठी भास्कर जाधव बॅग घेऊन तयार होते'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT