Rohit Pawar : 'सागर बंगला कुटुंब फोडण्यासाठी...', रोहित पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

सागर बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी, आमदारांना वाचवण्यासाठी आणि कुटुंब फोडण्याासाठी असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
rohit pawar critize devendra fadnavis manoj jarange patil sagar bunglow maratha reservation
social share
google news

Rohit Pawar Criticize Devendra Fadnavis : सागर बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी, आमदारांना वाचवण्यासाठी आणि कुटुंब फोडण्याासाठी असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. तसेच गरिबांना ज्या अडचणी आहेत त्यासाठी सागर बंगला काही मदत करीत नाही हे दुर्दैव, असल्याचा हल्ला देखील रोहित पवारांनी (Rohit Pawar) फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केला. (rohit pawar critize devendra fadnavis manoj jarange patil sagar bunglow maratha reservation) 

रोहित पवार पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रोहित पवार म्हणाले की, सागर बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी, सागर बंगला आमदारांना वाचवण्यासाठी, सागर बांगला कुटुंब फोडण्यासाठी आहे. मात्र गरिबांना ज्या अडचणी आहेत त्यासाठी सागर बंगला काही मदत करीत नाही हे दुर्दैव आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या  गृह खात्याशिवाय इतर खात्यात जास्त वेळ देण्याची गरज आहे. उत्तर प्रदेश  आणि बिहारपेक्षा जास्त अन्याय सामान्य नागरिकांवर आपल्या राज्यात होतो, त्यामुळे फडणवीसांनी लक्ष द्यावे,असा सल्ला रोहित पवारांनी यावेळी दिला.

हे ही वाचा : Maratha Reservation : अजित पवार जरांगेंवर संतापले

दरम्यान तुतारी चिन्हामुळे विरोधकांची अडचण होणार आहे. लग्नात गेल्यानंतर तिथे तुताऱ्या वाजणार आहेत, असे देखील रोहित पवार म्हणाले आहेत. चंद्रकांत दादा यांनी तुतारीवर केलेल्या टिकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, चंद्रकांत दादा यांनी थोर व्यक्तींबद्दल काय काय गुणगान गायले आहेत. हे आपल्या सर्वांना माहित आहे. जी व्यक्ती थोर व्यक्तींना किंमत देत नाही, महापुरुषांना किंमत देत नाही ती दुसऱ्यांच्या संघर्षाला कशी किंमत देतील, असा टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj Jarange : भाजप नेत्याने मनोज जरांगेंना सुनावलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT