Maratha Reservation : “आपापली व्होटबँक…”, संभाजीराजेंनी सर्वच नेत्यांवर ओढले ताशेरे

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sambhaji raje chhatrapati tweet : sambhaji raje slams all party leaders.
Sambhaji raje chhatrapati tweet : sambhaji raje slams all party leaders.
social share
google news

Sambhaji Raje chhatrapati On Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीला निमंत्रित पक्षाचे नेते उपस्थित होते. पण, संभाजी राजे छत्रपतींची खुर्ची रिकामी होती. त्यामुळे महत्त्वाच्या बैठकीला संभाजीराजे गैरहजर कसे अशी चर्चा झाली. यावर संभाजीराजेंनी लगेच खुलासा केला आणि बैठकांवरून सर्वच पक्षांच्या नेत्यांना फटकारले. (Why sambhaji raje didn’t attend all party meeting)

संभाजी राजे यांनी बैठकीला अनुपस्थित राहणामागील भूमिका विशद केली. त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे यांची प्रकृती आणि सरकारची भूमिका याबद्दल स्पष्ट शब्दात सुनावलं आहे.

बैठकांवरून सरकारला सुनावले खडेबोल

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत. मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shiv Sena : CM शिंदेंनी ठाकरेंना का दिलं नाही निमंत्रण? आमदाराने केला खुलासा

“गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते, मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला”, असे म्हणत संभाजीराजेंनी ठाकरे सरकारलाही सुनावलं आहे.

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘या’ मराठा व्यक्तीला मिळालं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र

“पण सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही”, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

संभाजीराजे बैठकीला का होते गैरहजर?

“सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील”, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT