“युद्धाला तोंड फुटेल”, संजय राऊतांचा अमित शाह-नरेंद्र मोदींवर हल्ला
Shiv Sena Crisis, Sanjay Raut : शिवसेना एकनाथ शिदेंच्या ताब्यात गेली. त्यामुळे ठाकरे विरुद्ध संघर्ष पेटला आहे. अमित शाह यांनीही पुण्यात मोठं विधान केलं होतं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून थेट मोदी-शाह-फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. “अमित शहा व फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले व सुरतला पाठवले”, असं मोठं विधान राऊतांनी केलं. संजय […]
ADVERTISEMENT

Shiv Sena Crisis, Sanjay Raut : शिवसेना एकनाथ शिदेंच्या ताब्यात गेली. त्यामुळे ठाकरे विरुद्ध संघर्ष पेटला आहे. अमित शाह यांनीही पुण्यात मोठं विधान केलं होतं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून थेट मोदी-शाह-फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. “अमित शहा व फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले व सुरतला पाठवले”, असं मोठं विधान राऊतांनी केलं.
संजय राऊतांनी रोखठोमध्ये म्हटलं आहे की, “ठाकऱ्यांची शिवसेना एका झटक्यात शिंद्यांची झाली. निवडणूक आयोगाने फक्त 40 आमदारांची ‘मते’ मोजून शिवसेना आणि धनुष्यबाणाचा सौदा केला. इतिहासात असे कधीच घडले नव्हते. लोकशाहीचा खून झाला असे नेहमीच म्हटले जाते, पण खून कसा करतात ते शिवसेनेच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने दाखवून दिले. पुढे काय होणार?”, असा सवाल राऊतांनी केला आहे.
“निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने ठाकऱ्यांची ऐतिहासिक शिवसेना शिंद्यांची झाली. त्या शिवसेनेचा पसारा आणि ओझे डोक्यावर घेऊन श्रीमान शिंदे किती तग धरणार? शिवसेना म्हणजे ‘ठाकरे’ हे समीकरण गेल्या पन्नास वर्षांपासून आहे. ते जगाला समजले, पण फक्त निवडणूक आयोगाला समजले नाही”, असं म्हणत राऊतांनी आयोगावर निशाणा साधला आहे.
Shiv Sena: शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील










