Ajit Pawar भाजपसोबत जाणार?; संजय राऊत म्हणाले, ’20-25 आमदार जाणं म्हणजे…’
अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांची भाजपसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा आहे.
ADVERTISEMENT
Ajit Pawar-Sanjay Raut : राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांची भाजपसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा आहे, त्यामुळे हे नेते शरद पवारांची मनधरणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी उभी फूट पडण्याची चिन्हे शक्यता व्यक्त केली जात आहे. याच घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. (Will ajit Pawar join BJP? What does Sanjay Raut said?)
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. “महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष या तिघांची आघाडी मजबूत आहे आणि या मजबूत आघाडीची भीती भारतीय जनता पक्षाला वाटते. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे म्हणून 2024 पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्याचं त्यांचं कारस्थान जरूर आहे. शिवसेनेचे आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असतील. वीस पंचवीस आमदार जाणं म्हणजे पक्ष खिळखिळा होणं असं होत नाही”, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांचा दावा काय?
“राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? पक्ष आजही शरद पवार या नावाशी बांधिल आहे. आजही शिवसेना उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे नावाशी बांधिल आहे. बातम्या वगैरे येतात. 40 फुटले, 50 फुटले अशा बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. मी दाव्याने सांगतोय, अजित पवारांविषयी, राष्ट्रवादीविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होताहेत त्या खोट्या आहेत”, असा दावा संजय राऊत यांनी केला.
हे वाचलं का?
संबंधित बातमी >> राष्ट्रवादीत होणार बंड! अजित पवारांसह 34 आमदार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत?
“भाजप या अफवा आणि वावड्या उठवत आहे. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, तसं काहीही होणार नाही. सगळ्यात जास्त पोटात गोळा आला असेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या गटात, या बातम्यांमुळे. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण, अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं राजकीय भविष्य महाविकास आघाडीतून शिखरावर जाणार आहे. त्यांच्याविषयी वावड्या उठवल्या जात आहेत, त्याचा महाविकास आघाडीच्या एकीवर काहीही परिणाम होणार नाही”, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शरद पवारांशी चर्चा…
आज सकाळी आम्ही सगळे एकमेकांशी बोललो आहोत. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे इतर काही प्रमुख नेते… आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी बोलून माहिती घेतली. हे आकडे कुठून येताहेत माहिती नाही. एकाच वृत्तपत्राला हे आकडे कुठून मिळतात? लोक एन्जॉय करत आहेत”, असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT