Savarkar row : सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो? समजून घ्या 5 मुद्द्यांमध्ये
महाराष्ट्रात राहूल गांधीच्या (Rahul Gandhi) सावरकर अस्त्राने महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे आहेत. ही पहिलीच वेळ नाही आहे,याआधी देखील कॉग्रेस अडचणीत आली होती. हे प्रसंग कोणते होते? आणि राहूल गांधी सावरकरांबद्दल काय म्हणाले होते? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

savarkar apologize rahul gandhi politics :मोदी आडनाव (Modi Surname case) प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खासदारकी रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकर अस्त्र बाहेर काढलं होतं.’माझं नाव सावरकर नाही आहे’, ‘माझं नाव गांधी आहे’.’गांधी कधी माफी मागू शकत नाही’ असे विधान करून त्यांनी भाजपला चांगलेच डिवचले होते. ज्या ज्या वेळेस राहूल गांधी राजकीय अडचणीत सापडतात, त्या त्या वेळेस ते या अस्त्रांचा वापर करतात. असे अनेकदा दिसून आले.सध्याच्या परीस्थितीत सुद्धा तेच सूरू आहे.मात्र सततच्या सावरकर ( VD Savarkar) अस्त्राच्या प्रयोगाने महाराष्ट्रात नेहमीच कॉग्रेसची अडचण झाली आहे. सद्यपरिस्थितीत देखील महाराष्ट्रात राहूल गांधीच्या (Rahul Gandhi) सावरकर अस्त्राने महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे आहेत. ही पहिलीच वेळ नाही आहे,याआधी देखील कॉग्रेस अडचणीत आली होती. हे प्रसंग कोणते होते? आणि राहूल गांधी सावरकरांबद्दल काय म्हणाले होते? हे जाणून घेऊयात. (savarkar apologize rahul gandhi politics maharashtra shivsena uddhav thackerey maharashtra politics)
राहुल गांधींना ठाकरे गटाचा इशारा
राहूल गांधी यांनी सावकरांबद्दल विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.एकीकडे राहूल गांधीवर झालेल्या कारवाईला ठाकरे गट विरोध करत असताना, दुसरीकडे मात्र सावरकरांवरील विधानाने ठाकरे गटाला राहूल गांधींना इशारा देण्याची वेळ आली होती. देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फोडू नका.सावरकर आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशाराच त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. मालेगावच्या शिवगर्जना सभेत त्यांनी हे विधान केले होते. या भूमिकेनंतर कॉग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या डिनर बैठकीवर देखील शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे ही वाचा : शरद पवारांची मध्यस्थी! राऊतांची राहुल गांधींसोबत चर्चा, काय घडलं?
स्वातंत्र्याच्या लढाईत सावरकरांचा सहभाग
देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सावरकर आणि महात्मा गांधीचा या दोघांचे मोठे योगदान आहे. दोघांच्या विचारधारेतही काहीच फरक नव्हता. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेवर भर दिला, तर सावरकरांनी टोकाच्या क्रांतीचे समर्थन केले होते.
दरम्यान 1910 साली नाशिकच्या इंग्रज कलेक्टर जॅक्सनची हत्या झाली होती. अभिनव भारत संस्थेच्या लोकांनी ही हत्या केल्याचा पोलिसांचा दावा होता. सावरकरांनी अभिनव भारत ही संस्था स्थापन केली होती. मात्र ज्यावेळेस जॅक्सनची हत्या झाली. त्यावेळी सावरकर लंडनमध्ये होते. ज्या बंदूकीतून जॅक्सनची हत्या झाली होती, ती बंदूक सावरकरांनी लंडनहून भाऊ गणेशसाठी पाठवली होती. तर जॅक्सनवर ज्या व्यक्तीने गोळी चालवली होती त्याचे नाव कान्हेर होते. त्याना नंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.










