शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त बैठकीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,’भेट झाली…’

ADVERTISEMENT

sharad pawar ajit pawar secret meeting pune devendra fadnavis reaction
sharad pawar ajit pawar secret meeting pune devendra fadnavis reaction
social share
google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शनिवारी गुप्त बैठक पार पडली. पुण्यातील कोरेगाव पार्कातील प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली. तब्बल अनेक तास बंगल्याच्या बंद दाराआड ही गुप्त चर्चा झाली. या बैठकीमागचा तपशील हाती आला नाही, मात्र या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.या गुप्त बैठकीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (sharad pawar ajit pawar secret meeting pune devendra fadnavis reaction)

देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीवर प्रश्न विचारण्यात आला होता. या बैठकीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला या भेटीबद्दल काहीही माहिती नाही. या भेटीमागचा माझ्याकडे तपशीलही नाही.भेट झाली? नाही झाली? कधी झाली? या संदर्भातली कुठलीच माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकू शकत नाही. मी त्याला सक्षम नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा : Sanjay Raut : “मोदी बैठकीत म्हणाले, आता माझ्या नावावर मते मागू नका”

तसेच मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार आहे का? असा सवाल पत्रकारांनी केला होता. मला माहिती मिळाली की मी तुम्हाला कळवतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक समन्वय समिती तयार केली आहे. ही समन्वय समिती ठरवेल. कुठलं महामंडळ कुणाला द्यायचं, अजुन काही ठरलं नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुप्त बैठकीत काय घडलं?

पुण्याचा कोरेगाव पार्कात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली. नेमकी किती तास ही बैठक सुरु होती, याची माहिती समोर आली नाही. मात्र या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील देखील उपस्थित होते,अशी माहिती आहे. बंगल्यावरील अनेक तासांंच्या बैठकीनंतर शरद पवार पहिल्यांदा घराबाहेर पडले. त्यानंतर काही मिनिटांनी अजित दादांच्या गाड्यांचा ताफा घराबाहेर पडला होता. त्यामुळे दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा : Thane : कळव्यातील ‘त्या’ रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

पुण्यात आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अजित पवार पुण्यात होते, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि राजेश टोपे पुण्यात होते. दोन्हीही नेते पुण्यात असल्याने हे बैठक जुळुन आली आहे.गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.अजित पवार गटाकडून यासाठी शरद पवारांची मनधरणी सुरु आहे. जरी शरद पवार अजित पवारांना पाठिंबा दर्शवत नसले तरी ते छुपा पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT