NCP: ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’, सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ

रोहित गोळे

ADVERTISEMENT

sharad pawar did not want to resign but ajit pawar group insisted to go with bjp so sharad pawar reluctantly resigned ncp leader supriya sule secret explosion
sharad pawar did not want to resign but ajit pawar group insisted to go with bjp so sharad pawar reluctantly resigned ncp leader supriya sule secret explosion
social share
google news

Supriya Sule: पुणे: ‘पवार साहेबांनी जो राजीनामा दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता. पण या सगळ्यांचा जो आग्रह होता, भाजप.. भाजप.. तेव्हा पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला.’ असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. (sharad pawar did not want to resign but ajit pawar group insisted to go with bjp so sharad pawar reluctantly resigned ncp leader supriya sule secret explosion)

शरद पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हा राजीनामा देण्याची शरद पवार यांची अजिबात इच्छा नव्हती. असा दावा सुप्रिया सुळेंनी केला. यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देखील प्रत्युत्तर देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्ना केला आहे.

हे ही वाचा>> गरब्यात मुस्लिमांना बंदी : ‘…तर PM मोदींची जास्त पंचाईत होईल’, ठाकरेंचा हल्ला

सुप्रियाताईंना अध्यक्ष करायचं आणि सुप्रियाताईंना अध्यक्ष केल्यानंतर मग आपण भाजपसोबत जायचं.. सरकारमध्ये जायचं.. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सरकारमध्ये जायचं हे ठरलं होतं. म्हणून शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. असा दावा छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. ज्याला सुप्रिया सुळेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळेंनी छगन भुजबळांना कोंडीत पकडलं?

‘पवार साहेबांनी जो राजीनामा दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता. पण या सगळ्यांचा जो आग्रह होता, भाजप.. भाजप.. तेव्हा पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला. त्यांना अजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ते सगळं नाट्य वाटत असेल पण आमच्यासाठी ते वास्तव होतं. त्यानंतर महाराष्ट्राची जनता त्यांनी पवार साहेबांना विनंती केली की, तुम्हालाच जबाबदारी घ्यावी लागेल.’

‘त्याच व्यासपीठावर भुजबळ म्हणाले की, कमिटी वैगरे काही नाही. तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल.’

ADVERTISEMENT

‘पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी या दोन्ही गोष्टी शरद पवारांना माहिती नव्हत्या. त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले. राजीनामा देताना पवार साहेबांनी सांगितलं की, मी तुमच्याबरोबर येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा.’

ADVERTISEMENT

‘मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. पण मला स्वत:ला तो एवढ्यासाठीच अस्वस्थ करणारा होता.. मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तर तो भाजपसोबत जाण्याचा असता.. तो मला करणं अशक्य होता. मी माझ्या विचारसरणीशी, माझ्या वडिलांशी तडजोड करणं अशक्य होतं.’

‘एका बाजूला सत्ता होती, सगळं होतं.. तर दुसऱ्या बाजूला संघर्ष होता.. मी सत्तेपेक्षा संर्घषाचा मार्ग निवडला.’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या राजीनाम्याबाबतचा नेमका घटनाक्रम देखील यावेळी सांगितला.

छगन भुजबळांनी काय दावा केला होता?

छगन भुजबळ हे मुलाखतीत म्हणाले होते की, ‘पवार साहेब म्हणाले होते की, मी जाणार नाही.. मी राजीनामा देईन मग सुप्रियाताईंनी अध्यक्ष व्हायचं आणि मग तुम्हाला पाहिजे ते करा. हे खरं आहे.’

हे ही वाचा>> “अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न…”, शरद पवारांची मोठी राजकीय भविष्यवाणी

‘पुढे असं झालं की, 15 दिवस घरात चर्चा झाली. अजितदादांना ते माहीत असावं. पवार साहेबांनी राजीनामा द्यायचा. जो त्यांनी चव्हाण सेंटरमध्ये दिला. त्यांनी राजीनामा दिला की, सुप्रियाताईंना अध्यक्ष करायचं आणि सुप्रियाताईंना अध्यक्ष केल्यानंतर मग आपण भाजपसोबत जायचं.. सरकारमध्ये जायचं.. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सरकारमध्ये जायचं हे ठरलं होतं. हे पवारांच्या घरी ठरलं म्हणून अचानक त्यांनी राजीनामा दिला.’ असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता.

सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा हा छगन भुजबळांचाच प्रस्ताव होता, शरद पवारांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, छगन भुजबळांच्या दाव्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील पत्रकार परिषद घेत भुजबळांचा दावा खोडून काढला. याबाबत शरद पवार म्हणाले की, ‘काही लोकांचा याबाबत आग्रह होता ही गोष्ट खरी आहे. सुप्रिया ताईंना अध्यक्ष करावा हा प्रस्ताव छगन भुजबळांचा होता. पण त्यांनी स्वीकारला नाही, स्वीकारण्याचं कारणही नव्हतं. कारण त्याच्यानंतर पुढची जी स्टेप होती ती आम्हाला कोणाला मंजूर नव्हती.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT