Prajakt Tanpure : अजित पवारांनी दिला मागून आवाज...'ये माझ्याकडे, काम...', वाचा इंटरेस्टिंग किस्सा
Prajakt Tanpure vs Ajit Pawar, Vidhan Sabha : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्रजक्त तनपुरे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र तनपुरे प्रश्न मांडत असताना अचानक समोरून अजित पवारांनी 'मला येऊन भेट' अशी ऑफरच दिली. यानंतर तनपुरे यांनी 'मी दादांना भेटत असतो' असे विधान केले आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
ADVERTISEMENT
Prajakt Tanpure vs Ajit Pawar, Vidhan Sabha : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्रजक्त तनपुरे यांनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत आक्रमक पावित्रा घेतला होता. तनपुरे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र तनपुरे (Prajakt Tanpure) प्रश्न मांडत असताना अचानक समोरून अजित पवारांनी (Ajit Pawar) 'मला येऊन भेट' अशी ऑफरच दिली. यानंतर तनपुरे यांनी 'मी दादांना भेटत असतो' असे विधान केले आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. (sharad pawar group mla prajakt tanpure angry on farmer question ajit pawar reply vidhan sabha maharashtra politics)
प्रजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. 'सरकार गेल्या पासून उरलेल्या तीन प्रकल्पांकडे कुणी ढुंकुनही पाहत नाही. तशाच अवस्थेत पडले आहेत. त्या भागातील शेतकऱ्याला दिवसा वीज मिळू शकली असती. पण अक्षरश पुढे काहीच काम झालेले नाहीत. आम्ही सातत्याने प्रश्न मांडतो...अशा आक्रमक भुमिकेत प्रजक्त तनपुरे असतानाच समोरून अजित पवारांचा अचानक आवाज येतो.
हे ही वाचा : Lok Sabha : ठाकरेंना 21, काँग्रेसला 15, पवारांना किती जागा?
प्रजक्त तनपुरेंची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आक्रमकता पाहून अजित पवारच समोरून अचानक आवाज देतात आणि तनपुरेंना म्हणतात, 'मला येऊन भेट', यावर तनपुरे म्हणतात, 'अजित दादांना भेटतो पण...', असे म्हणत तनपुरेंनी आपला प्रश्न मांडायला सुरुवात केली. ''शेतकऱ्याची ही मोठी अपेक्षा ही दिवसा वीज मिळावी. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही या ठिकाणी खुप प्रयत्न केले. आता मात्र आम्ही प्रत्येक अधिवेशनात ओरडून ओरडून सांगतोय. पण काही त्या ठिकाणी होताना दिसत नाही आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान आता अजित दादांनी सांगितलंय, 'मला येऊन भेट, पण मी दादांना भेटत असतो, तनपुरेंनी विधानसभेत असे विधान करताच एकच हास्यकल्लोळ झाला. मात्र नंतर लगेचच तनपुरेंनी हा म्हणजे नीधी मागण्याकरताच भेटत असतो, असी सारवासारव केली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.
हे ही वाचा : Lok Sabha : मविआला बसणार झटका, महायुतीचं काय होणार?
ADVERTISEMENT