NCP : शरद पवारांचा अजितदादांवर पलटवार, ‘तरूण असताना…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar reply ajit pawar on age statement criticize narendra modi ray nagar solapur maharashtra politics
sharad pawar reply ajit pawar on age statement criticize narendra modi ray nagar solapur maharashtra politics
social share
google news

Sharad Pawar Reply Ajit Pawar : विजयकुमार बाबर, सोलापूर : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उप मुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात नुकताच पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार हल्ला चढवला होता. ‘वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत’, अशी खंत वक्त अजित पवारांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवारांच्या या टीकेचा आता शरद पवारांनी समाचार घेतला आहे. अजित पवार हे तरुणच होते, त्यांना संधी कुणी दिली,असा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. (sharad pawar reply ajit pawar on age statement criticize narendra modi ray nagar solapur maharashtra politics)

शरद पवार सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार हे तरुणच होते, त्यांना संधी कुणी दिली? असा सवाल करत त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही असे विधान करत शरद पवार यांनी अजित दादांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सहकारी बँकेच्या कार्यक्रमात शरद पवारांच नाव न घेता टीका केली होती. ‘वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत’,असे अजित पवार म्हणाले होते.

हे ही वाचा : Crime : ‘कपडे काढले अन् उलटं टांगून…’, अनाथ आश्रमातील 21 मुलींसोबत सैतानी कृत्य!

‘केंद्र सरकार ईडीचा वापर हत्यार म्हणून करतेय’

शरद पवार यांनी यावेळी केंद्र सरकारवर आणि ईडीवरही टीका केली. रोहित पवारांच्या ईडीच्या नोटीसीवर शरद पवार म्हणाले की, विरोधकांना ईडीची भीती दाखवली जातं आहे. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात घातले,सामनाचे संपादक संजय राऊत यांना नोटीस बजावली, असे दाखले देत ईडीचा वापर ही सरकार हत्यार म्हणून करत आहे, एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोदींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रे नगरच्या उद्धाटनासाठी सोलापूरला आले होते. रे नगर गृहप्रकल्पाचा सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांना जातो.मोदी भर सभेत भावुक होऊन भाषण केले, मात्र मोदींनी किंवा भाजपने श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली. मोदी सोलापूरात येऊन रे नगर गृहप्रकल्पाचा उद्धाटन करून गेले, व्यासपीठावर थांबून मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणीना उजाळा दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत.महागाई जबरदस्त वाढली आहे. या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत,अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा : Ayodhya Ram Mandir: शिंदे सरकारचा मोठा निर्णय, 22 जानेवारीला महाराष्ट्रात…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT