Sharad Pawar Ajit Pawar: ‘पहाटेच्या शपथविधीनंतर ठरलं की…’, पवारांच्या विधानाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

'No Split in NCP' : sharad pawar sensational statement after the morning oath ceremony it was decided not to go with the bjp again So ajit pawar was given a chance latest news in maharashtra politics
'No Split in NCP' : sharad pawar sensational statement after the morning oath ceremony it was decided not to go with the bjp again So ajit pawar was given a chance latest news in maharashtra politics
social share
google news

Sharad Pawar Statement on Ajit Pawar: सातारा: ‘पहाटेच्या शपथविधीनंतर ठरलं होतं की, आमच्याकडून योग्य काम झालं नाही, चूक झाली होती.. अशी भूमिका अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतल्यानंतर त्यांना एक संधी देण्याचा निर्णय यावेळी पक्षाने घेतला होता. पण संधी ही सारखी मागायची नसते आणि संधी सारखी द्यायची देखील नसते.’ असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) अत्यंत मोठं विधान केलं आहे. ते साताऱ्यात एका कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (sharad pawar sensational statement after the morning oath ceremony it was decided not to go with the bjp again So ajit pawar was given a chance latest news in maharashtra politics)

ADVERTISEMENT

2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर 72 तासातच अजित पवार हे माघारी परतलेले. त्यामुळे त्यांना पक्षाने पुन्हा एकदा सामावून घेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद देऊ केलं होतं. मात्र, असं असताना साधारण वर्षभरापूर्वी ठाकरे सरकार कोसळलं. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष ठरला. ज्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद हे देखील अजित पवारांनाच मिळालं. पण साधारण दोन महिन्यांपूर्वीच अजित पवारांनी राष्ट्रवादीतील 8 दिग्गज नेत्यांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

या सगळ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्याआड बरंच राजकारण सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (25 ऑगस्ट) अजित पवार यांच्याविषयी एक मोठं विधान केलं आहे.

हे वाचलं का?

यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, अजित पवार यांना आता पुन्हा संधी देण्यात येणार नाही. ‘संधी ही सारखी मागायची नसते आणि मागितली तर संधी ही सारखी द्यायचीही नसते. आता आमची भूमिका स्पष्ट आहे.’ असं पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाविरोधातील असून आता त्यांना पक्ष पुन्हा संधी देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांचं मोठं विधान..

‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही…’

अजित पवार आणि अनेक आमदार हे बाहेर पडल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे का? असा सवाल जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘फूट याचा अर्थ पक्षाच्या एकंदर लोकांपैकी एखादा मोठा वर्ग हा वेगळी भूमिका घेऊन काम करतो. पक्षात जे काही 10-20 हे लोकं उठून बाहेर गेले, पक्ष सोडून गेले तर त्यांनी पक्षांतर केलं, पक्ष सोडला असं म्हणता येईल. त्यामुळे ही फूट नव्हे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Bawankule : “उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे अश्रू थांबले नाहीत, त्यामुळे आज…”

‘उद्या जर माझ्या एखाद्या सहकाऱ्याने पक्ष सोडायची भूमिका घेतली आणि त्यानंतर आणखी 10 लोकांनी तसाच निर्णय घेतला तर ही फूट होऊ शकत नाही. त्यांना जर का नव्या रस्त्याने जायचं असेल तर तो त्यांनी स्वीकारलेला आहे असेल असा निष्कर्ष काढता येईल.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘सारखी-सारखी संधी द्यायची नसते…’

दरम्यान, याचवेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं की, अजित पवारांना आता पुन्हा संधी दिली जाणार नाही. याविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘एकदा-दोनदा.. एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असेल आणि त्यानंतर ती दुरूस्त केली असेल तर ती दुरूस्ती ही एक संधी झाली. म्हणून पक्षाने यापूर्वी तसे निर्णय घेतले आहेत. तुम्हाला आठवत असेल एके दिवशी एक पहाटेचा शपथविधी झाला होता दोन लोकांचा.. त्यामध्ये आमचे एक सहकारी त्यात सहभागी होते. पण त्यानंतर जे काही झालं.. की, हे योग्य नाही.. आमच्याकडून योग्य काम झालं नाही.. पुन्हा त्या रस्त्याने जायचं नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी निर्णय घेतलेला होता.’

‘पण संधी ही सारखी मागायची नसते आणि मागितली तर संधी ही सारखी द्यायचीही नसते. आता आमची भूमिका स्पष्ट आहे.’ असं अत्यंत मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

‘अजित पवार आमचे नेते नाहीत…’

सुप्रिया सुळे यांनी आज वक्तव्य केलं की, पक्षात कोणतीही फूट पडलेली नसून अजित पवार हे आमचे नेते आहेत. याबाबत जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘आमचे नेते हे मी म्हणत नाही.. असं आहे की, सुप्रिया ही त्यांची धाकटी बहीण आहे. बहीण-भावाच्या नात्यात त्याअर्थी काही बोललं तर त्याचा लगेच राजकीय अर्थ काढायचं कारण नाही.’

हे ही वाचा >> Sharad Pawar : ‘थोडी अक्कल तर वापरा’, ‘तो’ प्रश्न ऐकताच पवारांचा चढला पारा

‘मी असं म्हणलो की नेते होते आमचे? असं म्हटलो नाही.. ती तुमची चूक आहे. ते सुप्रिया म्हणाली.. सुप्रिया सांगू शकतात.. पण जी भूमिका आमच्या या सहकाऱ्यांनी घेतली.. ते आमचे नेते नाहीत. ‘ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

‘बावनकुळे तारतम्य नसलेली विधानं करतात…’

यावेळी शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही विधानाचा समाचार घेतला. बावनकुळे म्हणालेले की, काही दिवसताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे भाजपला पाठिंबा जाहीर करतील.

त्यांच्या याच विधानाबाबत शरद पवार म्हणाले की, ‘माझी आणि बावनकुळेंची काही फार ओळख नाही. मी अलिकडेच त्यांना ओळखतो.. साधारणत: या पदावर राहणाऱ्या व्यक्तीला काही तरी तारतम्य बाळगण्याची एक कल्पना असते.’

‘पण ज्या पद्धतीने बोलतात.. त्यांचं एक स्टेटमेंट असतं की, आम्ही लोकांनी यांच्यावर टीका करू नये त्यांच्यावर टीका करू नये. उद्या त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली तर ते कदाचित ते म्हणू शकतात. पण जे आमच्या पक्षातले लोकं सोडून गेले त्यांच्यावर आम्ही टीका केली तर याची चिंता यांना का वाटते ते मला माहीत नाही.’

‘त्यामुळे ते जे काही बोलतात त्याला काही अर्थ नाही. ज्यांच्या बोलण्यात तारतम्य नाही त्यांना आपण अधिक महत्त्व देऊ नये.’ असं म्हणत शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, आता शरद पवारांच्या त्या विधानानंतर अजित पवार आणि भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT