Sharad Pawar on Saroj Patil : “डॉक्टरांना तू जरा रागव…” बहिणीने थेट शरद पवारांकडे का केली तक्रार
Sharad Pawar on Saroj Patil : शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असले की, ते आपल्या बहिणीच्या घरी भेट देतातच. यावेळीही त्यांनी दिली. त्यावेळी बहिणीने डॉक्टरांची तक्रार करताच त्यांनीच बहिणीला एक कानमंत्र दिला आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar on Saroj Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरातील दसरा चौकात कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात शरद पवार यांची सभा झाल्यानंतर शरद पवार यांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. त्या भेटीमध्ये एक महत्वाची भेट म्हणजे शरद पवार यांची बहिण सरोज पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली. सरोज पाटील म्हणजेच दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांच्या त्या पत्नी. शरद पवार यांची बहीण सरोज पाटील सध्या एका खासगी रुग्णालयात तब्बेत थोडी खालवल्याने त्या उपचार घेत आहेत. त्या रुग्णालयात जाऊन शरद पवार यांनी बहिणीची भेट घेतल्यानंतर त्यांच्या त्या भेटीचा व्हिडीओही आता व्हायरल झाला आहे. (Sharad Pawar sister Saroj Patil complained doctor)
ADVERTISEMENT
भावंडांच्या मायेच्या गप्पाटप्पा
शरद पवार यांनी सरोज पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी भावंडाच्या गप्पाटप्पा चालू झाल्या. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या चर्चेत सहभागही घेतला. शरद पवार यांनी आपल्या बहिणीच्या तब्बेतेची चौकशी करताना त्यांनी डॉक्टरांकडेही बहिणीच्या तब्बेतीची विचारपूस केली. शरद पवार डॉक्टरांबरोबर बोलत असतानाच सरोज पाटील यांनी डॉक्टरांची प्रेमळ अशी तक्रार केली.
हे ही वाचा >> PM Modi Exclusive Interview: ‘G20 चे अध्यक्ष पद अन् जगाला नवी दिशा देणारा नवा भारत’
शरद पवारांनी दिला बहिणीला सल्ला
शरद पवार यांनी ज्यावेळी आपल्या बहिणीची भेट रुग्णालयात जाऊन घेतली. त्यावेळी, ‘डॉक्टरांना जरा तू रागव, कारण ते माझ्याकडून पैसे घेत नाहीत अशी तक्रार त्यांनी शरद पवारांच्याकडे सरोज पाटील यांनी डॉक्टरांसमोरच केली. तर त्यांच्या तक्रारीवर त्यांनी शरद पवार यांनी डॉक्टरांना कोणताही सल्ला न देता त्यांनी आपल्या बहिणीलाच योग्य सल्ला आणि कानमंत्र दिला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Sharad Pawar: ‘जे महिलेनं सुनावलं ते…’, पवारांनी कोल्हापुरात जाऊन मुश्रीफांना डिवचलं!
तुझी तब्बेत चांगली राहिल…
सरोज पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस करताना त्यांनी शरद पवार यांच्याकडे डॉक्टर माझ्याकडून पैसे घेत नाहीत. त्यामुळे तू त्यांना रागव असं म्हटले. त्यावर शरद पवार म्हणाले की, तू कमी बोल म्हणजे तुझी तब्बेत चांगली राहिल असा कानमंत्र त्यांनी दिला. त्यांनी बहिणीला कानमंत्र देताच तिथे असलेल्या डॉक्टरांमध्ये हशा पिकला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT